नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक लोक मुंबई मध्ये पोहचतात. रविवार म्हणलं की मेगाब्लॉक हे समीकरणच जणू झाले आहे. मुंबईत येण्यासाठी बाहेर पडताना नेमका कुठे आणि कधी ब्लॉक आहे हे पाहून मगच बाहेर पडावे असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. (Railway Megablock)
मुंबईतील संभाव्य गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने (Western Railway) रविवारचा दिवसाचा ब्लॉक रद्द केला आहे. तर मध्य रेल्वेने मात्र माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. दरम्यान शनिवारी मध्यरात्री वसई रोड ते वैतरणादरम्यान अप-डाउन जलद मार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.वर्षातील शेवटचा रविवार (३१ डिसेंबर) आहे. हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवरील विविध तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान अनेक फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. (Railway Megablock)
कुठे असेल मेगाब्लॉक
रेल्वे ने दिलेल्या माहितीनुसार माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३.५५ पर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.या दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकलसेवा धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. डाउन जलद मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी १०:२० वाजता सुटणारी बदलापूर लोकल असेल.
(हेही वाचा : PM Narendra Modi : अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)
पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा बंद
ब्लॉकनंतरची बदलापूरसाठी पहिली लोकल दुपारी ३:३० वाजता सुटेल. रविवारी हार्बर लाईनवर देखील मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा बंद राहतील. तर ठाण्याकडे जाणाऱ्या काही लोकल देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community