नुकतीच सुरू झालेली मुंबई मेट्रो सेवा बुधवारी (९ ऑक्टोबर) रोजी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या भूमिगत मेट्रो लाइन ३ (Mumbai Metro 3) कॉरिडॉरवर या बिघाडामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, मेट्रोने या संदर्भात कोणतीही माहिती किंवा दिलगिरी व्यक्त केलेली नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता.
(हेही वाचा – ‘आप’ ला धडा शिकविण्यासाठी Congress दिल्लीत काढणार यात्रा)
सकाळी ९:३० वाजता सहार रोड स्थानकावरील दरवाजा बंद करण्याच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सेवा प्रभावित झाली. मुंबई मेट्रो लाइन ३ (Mumbai Metro 3), ज्याला एक्वा लाईन असेही नाव आहे. ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते आरे कॉलनी JVLR पर्यंतच्या १२.६९ किमी लांबीच्या फेज-१ मध्ये सोमवारी लोकांसाठी खुले करण्यात आले होते. तथापि, नवीन मार्गाच्या व्यावसायिक ऑपरेशनच्या तिसऱ्या दिवशीच मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मोठा त्रास झाला.
(हेही वाचा – Gram Sabha न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची हकालपट्टी)
त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने विलंबाबद्दल कोणतेही अपडेट दिले नव्हते. एका प्रवाशाने सांगितले, की उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याशिवाय प्रवाशांसाठी कोणतेही अपडेट मेट्रोने दिले नव्हते. सोमवारी सहार रोड स्थानकावर दरवाजा बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा मेट्रो सेवा प्रभावित झाली. मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत २०,४८२ प्रवाशांनी या नव्या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचा (Mumbai Metro 3) वापर केला, परंतु वाढत्या समस्यांमुळे प्रवाशांचा संताप वाढत होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community