Mumbai Metro: जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मेपर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

जेव्हीएलआर रोड रामबाग ब्रिज उत्तर वाहिनीवरील वाहतूक ही दक्षिण वाहिनीने वळविण्यात येईल.

154
Mumbai Metro: पावसामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, कसे असेल वेळापत्रक ? वाचा सविस्तर

साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज व एनटीपीसी जंक्शन येथे मेट्रो ६ प्रकल्पाचे एका खासगी कंपनीकडून मेट्रो स्टेशन उभारणीसाठी काम करणात येत आहे. त्यामुळे या कामासाठी ४ ते ३१ मे दरम्यान दररोज रात्री १ ते सकाळी ६वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये ठाकरेंना दणका! मध्यरात्रीच उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत )

कोणता रस्ता वाहतुकीसाठी बंद
१) जेव्हीएलआर रोड वरील गणेश घाट ते रामबाग रामबाग ब्रिज उतरणी पर्यंत उत्तर वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
२) जेव्हीएलआर रोड वरील पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन पर्यंतची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

कोणत्या पर्यायी रस्त्यांचा वापर कराल?
१) जेव्हीएलआर रोड रामबाग ब्रिज उत्तर वाहिनीवरील वाहतूक ही दक्षिण वाहिनीने वळविण्यात येईल तसेच ब्रिजच्या दक्षिण वाहिनी वरील वाहतूक हि सेवा मार्गाने वळविण्यात येईल.
२) जेव्हीएलआर रोड पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शनदरम्यानची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक ही उत्तर वाहिनीने वळविण्यात येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.