Mumbai Metro Line 03 : मुंबईकरांना आवडे भुयारी मेट्रो! पहिल्याच दिवशी १५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी लुटला आनंद 

83
Mumbai Metro Line 03 : मुंबईकरांना आवडे भुयारी मेट्रो! पहिल्याच दिवशी १५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी लुटला आनंद 
Mumbai Metro Line 03 : मुंबईकरांना आवडे भुयारी मेट्रो! पहिल्याच दिवशी १५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी लुटला आनंद 

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक (Mumbai Traffic) व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहर आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो ३ (Mumbai Metro 3) या भूमिगत मेट्रो तयार करण्यात आली. दरम्यान, मुंबईकरांची या मेट्रोची प्रतीक्षा संपली आणि सोमवारपासून आरे ते बीकेसीपर्यंत (Aarey to BKC) पहिल्या टप्प्यात या भुयारी मार्गातून प्रवासाला सुरुवात झाली. सोमवारी (०७ ऑक्टोबर) या भुयारी मेट्रोतून जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मुंबईकर सज्ज झाले होते. मेट्रो-३नेही मुंबईकरांचे मन:पूर्वक स्वागत केले. पहिल्या दिवशी १५ हजार ७१३ मुंबईकरांनी बीकेसी ते आरे या प्रवासमार्गाचा आनंद लुटला. 

मुंबईत ५९ किमी मेट्रोचे जाळे 

मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याच्या मार्गामुळे आता मुंबईकरांच्या सेवेत ५९ किमी अंतराचे मेट्रो जाळे दाखल झाले आहे. मुंबई महानगरात जवळपास ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, येत्या काही वर्षांत हे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे.

(हेही वाचा – BJP ला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी MIM ला जवळ करणार?)

८ ऑक्टोबरपासूनचे मेट्रोचे नवे वेळापत्रक 

सोमवार ते शनिवार

– पहिली गाडी सकाळी ६:३० 

– शेवटची गाडी रात्री १०:३० 

रविवारी 

– पहिली मेट्रो सकाळी ८:३० 

– शेवटची गाडी रात्री १०:३०

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.