Mumbai Metro : मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मान्सूनसाठी सज्ज; पूरस्थिती नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा

सर्व ठिकाणी पुरेशी रोषणाई केली जाईल. रस्त्यांवरील खड्डे व खराब पॅच ओळखून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच खराब झालेल्या गटारांची झाकणं बदलण्याचे कामही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

161
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मान्सूनसाठी सज्ज झाली असून, कुलाबा-वाांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावर पावसाळ्याशी संबंधीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय पाण्याचा जलद निचरा होण्यासह पूरस्थितीच्या नियंत्रणासाठी पुरेशा प्रमाणात डि-वॉटरिंग पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण १.५ एचपी ते ७५ एचपी क्षमतेचे एकूण ३७१ पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढून टाकणे तसेच कॅच पिट्स बांधणे अशी कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये याकरता सर्व बाजूंचे दिशादर्शक, चेतावणी चिन्हे, वाहतूक चिन्हे याची नव्याने रंगरंगोटी करण्याचे काम सुरू असून बॅरिकेट्सवर ब्लिंकर्स साइट्सवर उपलब्ध करण्यात आले आहेत.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रभाव क्षेत्रामध्ये बॅरिकेड्सची दृश्यमानता वाढविण्यासाठी त्याची देखभाल केली जाईल. सुरक्षिततेच्या कारणास्तव पादचाऱ्यांकरता उपलब्ध असलेल्या रेलिंगवर रिफ्लेक्टीव्ह स्टिकर्स लावले जातील. तसेच साइट्सवर नियमितपणे विजेच्या तारा, केबल वायर्स यांसारख्या विद्युत वाहिन्यांचे ऑडिट केले जाईल. पावसाळ्यात विद्युत आणि दळणवळण व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुं.मे.रे.कॉ. संबंधीत संस्थांसोबत समन्वय साधेल. बांधकामास्थळी साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. सर्व ठिकाणी पुरेशी रोषणाई केली जाईल. रस्त्यांवरील खड्डे व खराब पॅच ओळखून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच खराब झालेल्या गटारांची झाकणं बदलण्याचे कामही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

मुंबईकरांची गैरसोय होणार नाही

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुं.मे.रे.कॉ. समन्वय साधून मान्सून काळातील घ्यावयाच्या तयारीवर काम करत आहेत. मुं.मे.रे.कॉ.च्या वतीने पावसाळ्यात मेट्रो-३ च्या बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच स्थानकांच्या परिसरात पाणी साचू नये, याकरता अधिकारी तैनात केले जातील. मेट्रो-३ च्या सर्व बांधकाम ठिकाणांवर ठोस उपाययोजना केल्या जातील. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेणाऱ्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.