वर्सोवा – घाटकोपर (Versova – Ghatkopar) मेट्रो १ मार्गिकेवर आता विनातिकीट प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो (Mumbai Metro) वन प्रशासनाने तिकीटरागांमध्ये उभे रहाण्यापासून सुटका केली आहे. मेट्रो वन प्रशासनाने टॅप-टॅप विअरेबल तिकीट बुधवार, १० एप्रिल रोजी लाँच केले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट हातात बाळगण्याची किंवा मोबाइलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून स्थानकात प्रवेश करण्याची गरज पडणार नाही. (Mumbai Metro)
(हेही वाचा- Rajkumar Anand : भ्रष्टाचाराच्या व्यवहारांत नाव नोंदवायचे नाही; राजीनामा देतांना काय म्हणाले आपचे मंत्री)
मनगटावर परिधान केलेले स्मार्ट बँड (Smart band) मेट्रोस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील एएफसी गेटवर स्कॅन करताच प्रवाशांना स्थानकात प्रवेश मिळणार आहे. प्रवाशांना हा स्मार्ट बँड २०० रुपयांना मिळणार असून, ते रिचार्ज करता येणार आहे. सध्या मेट्रो १ मार्गिकेवरून २ लाख ८५ हजार प्रवाशांकडून डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करून प्रवास केला जात आहे. त्यामध्ये ९० हजार प्रवासी मोबाइलवरून क्यूआर कोड प्रणालीचा वापर करत आहेत. आता स्मार्ट बँड (Smart band) पद्धत लागू केल्याने डिजिटल तिकीट घेता येणे शक्य होणार आहे. (Mumbai Metro)
मेट्रोने दिल्या डिजिटल सुविधा
- हे टॅप-टॅप विअरेबल तिकीट पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केले आहे. ते बॅटरीशिवाय चालते. जलरोधक आणि सहज वापरता येण्याजोगे !
- यापूर्वी कॉम्बो कार्ड, मोबाइल क्यूआर तिकीट, लॉयल्टी रिवार्ड्स प्रोग्राम, प्रवास पास यासारख्या सुविधांनी वाचवला प्रवाशांचा वेळ !
- काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅप ई-तिकीटची सुविधाही केली लाँच !
(हेही वाचा- Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ? एनसीबीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र)
मेट्रो वन मार्गिका सुरू झाल्यापासून गेल्या १० वर्षांत ९५० दशलक्ष प्रवाशांनी या मार्गिकेवरून प्रवास केला आहे. सद्यःस्थितीत मेट्रो वन मार्गिकेवर दरदिवशी ४१८ फेऱ्या होत आहेत. त्या माध्यमातून सुमारे ४ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. (Mumbai Metro)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community