मेट्रो १ च्या वेळेत वाढ; शेवटची गाडी रात्री पावणे बारा वाजता सुटणार

212

कोरोना काळात मेट्रो सेवेचा कालावधी आणि फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या परंतु कालांतराने या फेऱ्या टप्याटप्प्याने वाढवण्यात आल्या. आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशिरापर्यंत धावणार असून शनिवारपासून शेवटची गाडी रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी सुटणार आहे. अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) देण्यात आली.

( हेही वाचा : Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! AC लोकलच्या ८ फेऱ्या वाढणार; पहा वेळापत्रक)

एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ५ ऑगस्टपर्यंत घाटकोपरवरून रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी शेवटची गाडी सुटत होती. मात्र शनिवार ६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी शेवटची गाडी सुटणार आहे, ही मेट्रो वर्सोव्याला रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी रात्री ११ वाजून १९ मिनिटांत सुटणार आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल

दरम्यान कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पहिले चार डबे मुंबईत दाखल झाले आहेत. ४२ टन वजनाचा प्रत्येक डबा खास प्रकारच्या ट्रेलरवरून आणण्यात आला. या ८-ऐक्सेल ट्रेलर्सना ६४ चाकं असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.