Mumbai Metro : आरे ते कफ परेड मेट्रो धावणार, जाणून घ्या मेट्रो ३ मार्गिकेची प्रमुख वैशिष्ट्ये

डिसेंबरपर्यंत आरे-बीकेसी मार्गिका सुरू करण्याचे नियोजन

109
Mumbai Metro : आरे ते कफ परेड मेट्रो धावणार, जाणून घ्या मेट्रो ३ मार्गिकेची प्रमुख वैशिष्टये
Mumbai Metro : आरे ते कफ परेड मेट्रो धावणार, जाणून घ्या मेट्रो ३ मार्गिकेची प्रमुख वैशिष्टये

आरे ते कफ परेड या मेट्रो (Mumbai Metro) ३ भूमिगत मार्गिकेसाठी आठ गाड्या आरे येथील कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

आरे ते कफ परेड ही मेट्रो मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मार्गिका आहे. एकूण ३३ किमी लांबीची ही मार्गिका आहे. या मार्गिकेवर २६ स्थानके भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवर आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा १६ किलोमीटर लांबीचा असेल. पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

(हेही वाचा  – Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामांतराचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात गाजणार )

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी)कडून या मेट्रोच्या कामाबाबत जोरात तयारी सुरू आहे. यासाठी एमएमआरसीचे उच्च अधिकारी तातडीने या प्रकल्पाचा पाहणी दौरा करत आहेत, तर आरे कारशेडमध्ये मेट्रोसाठीचे डबे आणि गाड्या उभ्या करण्यासही सुरुवात झाली आहे.

मेट्रो ३ मार्गिकेची वैशिष्ट्ये
– राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो
– एकूण खर्च ३३ हजार कोटी रुपये
– एकूण स्थानके २७
– पहिल्या टप्प्यात १० स्थानके
– पहिल्या टप्प्यात ९५ टक्के काम पूर्ण
– संपूर्ण मार्गिकेचे १०० टक्के भुयारीकरण
– एकूण २४८ डबे
– एकूण ३१ गाड्या
– अलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड हे डब्यांचे उत्पादक

अत्याधुनिक प्रणालीवर सज्ज असलेले डबे कमीतकमी विजेवर अधिकाधिक क्षमतेने धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रत्येकी आठ डब्यांच्या एकूण ९ गाड्यांची गरज असेल. डिसेंबरपर्यंत आरे-बीकेसी मार्गिका सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एमएमआरसीने (Mumbai Metro Rail Corporation) दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.