मेट्रो १ ने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे ई- तिकीट वितरित करण्याची प्रणाली सुरू केली आहे. तसेच यात्री या अॅपवर सुद्धा मेट्रोची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. तिन्ही मेट्रोसह मोनो रेल्वेचे वेळापत्रक सुद्धा यात्री अॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल, पहा फोटो)
मुंबईत सध्या मेट्रो १ ( घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ व मेट्रो ७ ( गुंदवली ते दहिसर) या तीन मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहे. तसेच मुंबईत मोनो रेल्वेसेवाही सुरू आहे. यात्री अॅपवर या सर्व सेवांची माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपवर तिकीट
प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो प्रशासनाच्या क्रमांकावर इंग्रजीत Hi असे टाइप करून पाठवताच त्यांना ओटीपी क्रमांक व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार आहे. तिकीट खिडकीवर हा ओटीपी किंवा लिंकचा वापर करून रोख पैसे देताच व्हॉट्सअॅपवर ई-तिकीट येणार आहे. हे तिकीट स्कॅन केल्यावर प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागणार आहे. यानंतर प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर लिंक येईल याद्वारे प्रवासी ई-तिकीट खरेदी करू शकतात. स्मार्ट फोनवरून मुंबई मेट्रो वन ई-तिकीट खरेदी करण्यासाठी फक्त व्हॉट्सअॅप वापरणे आवश्यक आहे. या तिकिटावर क्यू आर कोड सुद्धा उपलब्ध असणार आहे. या नव्या योजनेमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे.
Join Our WhatsApp Community