मुंबई मेट्रो देणार मुंबईकरांना ‘न्यू ईयर गिफ्ट’! ‘या’ दोन मार्गिका सूरू होणार

या मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

मुंबई उपनगरातील नागरिकांना रोजच्या वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागत आहे. पण आता काही महिन्यांतच मुंबईकरांची या समस्येतून सुटका होणार आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत या मार्गांवरील मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात मुंबईकरांना मेट्रोकडून ही भेट दिली जाणार आहे.

लवकरच काम पूर्ण

अंधेरी-पूर्वे ते दहिसर(रेड लाईन-7) आणि डीएन नगर ते दहिसर(येलो लाईन-2ए) या प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण होणार असून, सध्या या मार्गांवर मेट्रोच्या फे-यांची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे पुढील तीन ते पाच महिन्यांत या मार्गावरील मेट्रो सेवा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात येईल, असे एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना म्हटले आहे.

मुंबईकरांची डोकेदुखी कमी होणार

पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच उपनगरातील काही प्रमुख ठिकाणी सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. पण या मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

असे आहे मेट्रोचे जाळे

लाईन 7 – दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (उन्नत)

अंतर – 16.495 किमी

डेपो- दहिसर (प्रस्तावित) आणि मालवणी (तात्पुरती व्यवस्था)

स्थानके (एकूण 14) – दहिसर पूर्व, ओवरीपाडा, नॅशनल पार्क, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, पुष्पा पार्क, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर), शंकरवाडी, गुंदवली.

लाईन 2 ए – दहिसर पूर्व ते डी. एन. नगर-अंधेरी (उन्नत)

अंतर – 18.589 किमी.

डेपो – मालवणी

स्थानके (एकूण 17)- दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्थानक (आनंद नगर), कांदरपाडा (ऋषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एक्सर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहाडी एक्सर (शिंपोली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वालनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहाडी गोरेगाव (बांगुरनगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्राr नगर) आणि अंधेरी पूर्व (डी. एन. नगर).

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here