Mumbai Mhada lottery : म्हाडाच्या २०३० घरांसाठी मंगळवारी सोडत; कोण ठरणार भाग्यवान ? जाणून घ्या एक क्लिकवर   

121
Mumbai Mhada lottery : म्हाडाच्या २०३० घरांसाठी मंगळवारी सोडत; कोण ठरणार भाग्यवान ? जाणून घ्या एक क्लिकवर   
Mumbai Mhada lottery : म्हाडाच्या २०३० घरांसाठी मंगळवारी सोडत; कोण ठरणार भाग्यवान ? जाणून घ्या एक क्लिकवर   

मुंबईत घर घेण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मंगळवारी (08 ऑक्टोबर) म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरीची (Mhada Mumbai Board Lottery 2030) सोडत जाहीर होणार आहे. म्हाडाने 2024 या वर्षात 2,030 घरांसाठी लॉटरी काढली होती. 8 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10:30 वाजता सोडतीचा निकाल जाहीर होणार असून या सोडतीत एक लाख 13 हजार 542 अर्जदार सहभागी होणार आहेत. (Mumbai Mhada lottery )

म्हाडाच्या 2030 घरांसाठी तब्बल 1,13 हजार 811 अर्ज आले होते. मात्र त्यापैकी 1,13,811 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. मात्र यापैकी २६९ अर्ज अपात्र ठरले होते. नरिमन पॉईंट येथे पार पडणाऱ्या सोडतीसाठी अर्जदारांना प्रथम प्राधान्यनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तर या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता न येणाऱ्यांसाठी सोडतीच्या थेट प्रेक्षपणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

(हेही वाचा – Navratri 2024 : महाभोंडल्याच्या निमित्ताने ठाणे शहरात चैतन्याची अनुभूती !)

1 लाखांच्या वर अर्ज

मुंबईतील या 2030 घरांसाठी म्हाडाने 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2024 या काळात सोडत प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर या सोडतीसाठी एकूण 1 लाख 13 हजार 811 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केला होता. मात्र यापैकी 269 अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे बाद झाले होते. त्यामुळे आता 1 लाख 13 हजार 242 अर्ज शर्यतीत आहेत. 

लाईव्ह कार्यक्रम कुठे पाहता येणार

अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर पाहता येईल. (Mumbai Mhada lottery )

(हेही वाचा – Mumbai Metro Line 03 : मुंबईकरांना आवडे भुयारी मेट्रो! पहिल्याच दिवशी १५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी लुटला आनंद )

घर मिळालं की नाही हे नेमकं कधी समजणार?

वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचनापत्र पाठविले जाणार आहे. त्यानंतर सूचनापत्रातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र पाठविले जाणार आहे. 

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.