Air Pollution: मुंबईतल्या प्रदूषणाने दिल्लीलाही मागे टाकलं, पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना नोटिस

मुंबई महापालिकेकडून रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत

119
Air Pollution: मुंबईतल्या प्रदूषणाने दिल्लीलाही मागे टाकलं, पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना नोटिस
Air Pollution: मुंबईतल्या प्रदूषणाने दिल्लीलाही मागे टाकलं, पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना नोटिस

मुंबईतील ( Mumbai ) हवेत धुलीकण आणि धुरक्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असल्यामुळे हवेची पातळी (Air Pollution) धोकादायक बनली आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक तपासला असता मुंबईतील हवेच्या प्रदूषणाने दिल्लीलाही मागे टाकले आहे.

आज सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) ३०० ची पातळी गाठली आहे,तर दिल्लीत सकाळी १० वाजेपर्यंत ही पातळी २४९ इतकी होती. त्यामुळे मुंबई हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले असून मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे.

चेंबूरच्या माहुल येथे पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स, सिलॉर्ड कंटेनर्स, अंबापाडा या उद्योगांना नोटिसा (violating environmental laws) बजावल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत, जेणेकरून हवेतील धुलीकण जमिनीवर येतील, मात्र हे उपाय तोकडे पडत असल्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा – Sahyadri Express: कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार)

निर्देशांक आणि हवेची गुणवत्ता
२०१ ते ३०० हवेचा गुणवत्ता निर्देशांक हवा प्रदूषित, खराब असल्याचे दर्शवते, तर ३०१ ते ५०० दरम्यान हवेचा गुणवत्ता निर्देशांक हवेची गंभीर स्थिती असल्याचे दर्शवते. मुंबईने आज ३००चा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत गेल्या वर्षी सर्वाधिक हवा प्रदूषणाची समस्या नोव्हेंबर महिन्यात निर्माण झाली होती, मात्र यावर्षी एक महिना आधीच मुंबईतील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे.

प्रदूषण नियंत्रित करणे शक्य
दिल्लीच्या पर्यावरण मंत्रालयाने सांगितले की, दिल्ली आणि एनसीआरमध्ये GRAP-2 अंतर्गत, कोळसा आणि लाकडाच्या वापरावर बंदी, सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसच्या जास्त फेऱ्या, रस्त्यांची नियमित स्वच्छता, पाणी शिंपडणे आणि ट्रॅफिक जाम रोखून प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.