कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती रुग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळामुळे 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या 5 रुग्णालयांत 439 डॉक्टरांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रुग्णालयातील डॉक्टरांसाठी एकूण 1706 पदे उपलब्ध आहेत. त्यापैकी 323 डॉक्टर्स कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत. कळव्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतही रुग्णांचे मृत्यू सत्र सुरू झाल्यानंतर डॉक्टरांची रिक्त पदे भरली जाणार का, संतप्त सवाल आरोग्य सेवा कार्यकर्त्यांनी विचारला आहे.
महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम, सायन येथील टिळक, विलेपार्ले येथील कूपर, मुंबई सेंट्रल येथील नायर आणि नायर दंत वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांची 439 पदे रिक्त आहेत. त्यापैकी परळ येथील केईएम रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात दर दिवसाला किमान 9 हजार रुग्ण उपचारासाठी येतात. मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील बऱ्याचदा सायन येथील टिळक रुग्णालयात आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाला देतात भेट देतात.
( हेही वाचा – Diet : डायटिंग करत असताना ‘या’ सफेद गोष्टी टाळा)
कर्जत आणि पनवेल परिसरातील रुग्ण दीर्घकालीन उपचारांसाठी टिळक रुग्णालयात होतात. टिळक रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात अंदाजे 5 हजार रुग्ण उपचार घेतात. नायर रुग्णालयातही बाह्य रुग्ण उपचार घेतात.पालिकेच्या चारही प्रमुख रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णांची मोठी रांग लागते. शस्त्रक्रियांसाठी कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागते.सिटीस्कॅन आणि एमआरआयसारख्या महत्त्वाच्या चाचण्यांसाठी 6 महिन्यांनी रुग्णालयाकडून तपासणीसाठी वेळ दिली जाते.
डॉक्टरांची एकूण 1606 रिक्त पदे कायमस्वरूपी भरून घ्या, ही भरती तातडीने करा, अशी मागणी कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या डॉक्टरांनी केली आहे. या मागणीबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, डॉक्टरांची रिक्त पदे महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (एमपीएससी) च्या वतीने भरली जातील. रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त पदांची भरती होण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत डॉक्टरांची सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्यावर प्राधान्य देण्यात आले आहे.
हेही पहा –