मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) हे सध्या आपल्या कामकाजात अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. चहल (Iqbal Singh Chahal) यांचा आयुक्त पदाचा तीन वर्षांचा कालावधी मागील मे महिन्यात संपुष्टात आला असला तरी त्यांची बदली करण्यात आलेली नाही. विद्यमान सरकार हे त्यांची बदली करण्यास इच्छुक नसले तरी सध्याचे महापालिकेतील कामकाज आणि सततची धावपळ पाहता चहल (Iqbal Singh Chahal) यांना आता मात्र आपली बदली हवी आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे आपल्या मर्जीतील महापालिकेतील एका अधिकाऱ्यालाच अधिक महत्त्व देत असल्याने चहल यांच्यातील ही अस्वस्थता अधिकच जाणवू लागली असल्याचे दिसून येत आहे. (BMC)
राज्यातील ठाकरे सरकार जावून एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली होईल असे बोलले जात होते, पण शिंदे यांनी चहल यांना मुंबईत कायम ठेवले. पण त्यांचा आयुक्त पदाचा तीन वर्षांचा कालावधी मे २०२३मध्ये संपुष्टात आल्यानंतर पावसाळ्याच्या कालावधीत त्यांची बदली करण्याऐवजी त्यांना त्या पदावर कायम ठेवले गेले. त्यामुळे पावसाळ्यानंतर त्यांची बदली होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच चौथा महिना उजाडला. चहल हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तथा सरकारला अभिप्रेत काम करत असल्याने त्यांची खुंटी मजबूत झाल्याचे पहायला मिळत आहे. (BMC)
परंतु महापालिका आयुक्त पदावरून चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली ही सरकारच्या इच्छेवर अवलंबून असल्याने त्यांच्या बदलीचे वाहणारे वारे बंद झाले असले तरी आता खुद्द चहल यांनाच बदली हवी आहे. मागील काही दिवसांपासून चहल यांचे महापालिकेच्या कामकाजात मन रमताना दिसत नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनही आयुक्तांना अधिक विश्वासात घेतले जात नसल्याने ही अस्वस्थता अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. (BMC)
(हेही वाचा – Shri Ram Mandir : अयोध्येत बाळासाहेब ठाकरेंचाही सन्मान व्हावा याकरता मनसेने केली ‘ही’ मागणी )
हवेतील प्रदुषण नियंत्रणासाठी अधिक मेहनत
महापालिकेत सध्या आयुक्तांऐवजी अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांनाच अधिक मान दिला जात आहे. मुख्यमंत्री हे अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) यांनाच अधिक सूचना तसेच निर्देश देत असून त्याप्रमाणे ते काम करत आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत अशाप्रकारे संपूर्ण स्वच्छता मोहिमेसह (Deep cleaning drive) हवेतील प्रदुषण नियंत्रणासाठी अधिक मेहनत घेत आहेत. यासाठी रस्त्यावर उतरुन हे अतिरिक्त आयुक्त काम करत असल्याने सध्या ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुखातही त्यांचेच नाव असून खुद्द आयुक्तांचाही त्यांना विसर पडला आहे. (BMC)
त्यामुळेच आता महापालिकेच्या कामकाजात आयुक्तांचे मन रमताना दिसत नसून आता यापुढे महापालिकेत राहण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. आयुक्तांसोबतच अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही आता मुख्यमंत्र्यांकडून विशेष महत्व दिले जात नाही. त्यामुळे आयआरएस अधिकारी असलेल्या अतिरिक्त आयुक्तांनाच मुख्यमंत्र्यांकडून अधिक महत्व दिले जात असल्याने महापालिकेतील सर्व सनदी अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे चहल यांच्यासोबतच पी वेलरासूही आता महापालिकेत अधिक काळ राहण्याच्या मनस्थितीत दिसत नसून दोन्ही अधिकारी हे आपल्या बदलीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, चहल यांनी आपल्या बदलीची पूर्णपणे पूर्व तयारीही केल्याचीही माहिती मिळत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community