मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मधील ‘सोगो’ कुटुंब आता आणखी एका जागतिक विक्रमास गवसणी घालणार आहे. घालायला निघाले आहे. ‘देव आनंद’यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या कुटुंबाच्या वतीने येत्या रविवार, ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘याद किया दिलने..’ हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यात देव आनंदायी यांच्या १०० गाण्यांची मेडली सादर केली जाणार आहे.
पद्मभूषण विजेते तथा चित्रपटसृष्टीतील पहिले चॉकलेट हिरो, एव्हरग्रीन ‘देव आनंद’ यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांच्या सदाबहार गाण्यांच्या मेडलीच हा माटुंगा रोड (पश्चिम) येथील जे के सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहा शेजारी, रुपारेल कॉलेज जवळ दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये येत्या रविवार, ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत आयोजित केला आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून जास्तीत जास्त श्रोत्यांनी तथा प्रेक्षकांनी या विक्रमी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सोगो अर्थात सोनटक्के-गोवेकर कुटुंबाने केले आहे.
सलग २०० मिनिटांची ही मेडली जागतिक विक्रम ठरणार आहे. एकाच कलाकाराची (देव आनंद) सोलो व ड्युएट्स अशी १०० गीते ही महापालिकेच्या एकाच संस्थेमधील २७ गायक कलाकार हे सादर करणार आहेत. या अनोख्या विक्रमाची दखल व नोंद ‘ओ माय गॉड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ही संस्था घेणार आहे. महापालिकेतील मधील गायक कलाकारांना तसेच हौशी गायक कलाकारांना संधी मिळावी या करिता ‘सो गो ‘कुटुंबाने जानेवारी २०१७ पासून विविध व अनोखे विषय तथा कल्पना विचारात घेऊन करा ओके ट्रॅक्सवर कार्यक्रम सादर केले आहेत. आजपर्यंत असे पन्नासहून अधिक कार्यक्रम त्यांनी यशस्वीरीत्या सादर केले आहेत.
(हेही वाचा – DPDC Fund : गतिमान सरकारची ‘कासवगती’; सहा महिन्यांत ‘डीपीडीसी’मधील केवळ पाच टक्के निधी खर्च)
मागील दोन वर्षात सोगो कुटुंबाने दोन जागतिक विक्रम केले आहेत. ११ डिसेंम्बर २०२१ रोजी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘जिंदगी भर नहीं भुलेंगे वो साहिर के गीत’ या कार्यक्रमात एकाच गीतकाराने लिहिलेली (गीतकार साहिर लुधियानवी) ११८ एकल गीते (सोलो) एकाच संस्थेमधील (बीएमसी) कलाकारांनी कराओके ट्रॅक्सवर सादर करत विक्रम केला होता. तर १० डिसेंम्बर २०२२ रोजी गीतकार हसरत जयपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘तुम तो प्यार हो’ या कार्यक्रमात एकाच गीतकाराने लिहिलेली (गीतकार हसरत जयपुरी) ११० युगल गीते (ड्यूएट्स) एकाच संस्थेमधील (बीएमसी) १२६ गायक कलाकारांनी करा ओके ट्रॅक्सवर सादर केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community