- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील ६९० रिक्तपदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आल्यानंतर आता यातील पात्र उमेदवारांच्या ९ फेब्रुवारी आणि २ ते ९ मार्च २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यांत या पदांसाठी अर्ज मागवण्यात आल्यानंतर या परीक्षा प्रत्यक्षात कधी होणार याची प्रतीक्षा उमेदवारांमध्ये होती, त्यामुळे अखेर ऑनलाईन परीक्षेची तारीख महापालिका प्रशासनाने जाहीर केल्याने यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना अभ्यासाला लागा, असाच संदेशच महापालिकेने दिला आहे. (BMC)
(हेही वाचा – Republic Day : महाराष्ट्रातील 48 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर)
मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/ वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील ही ६९० रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याकरता आय. बी. पी. एस या संस्थेची नेमणूक यापूर्वीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून शासनाच्या मान्यतेनंतर आचारसंहितेच्या आधीच याची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यातील अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाणार असे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहिर केले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता, (सिव्हील)-२५० पदे, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत)-१३० पदे, दुय्यम अभियंता (सिव्हील)-२३३ पदे, दुय्यम अभियंता, (यांत्रिक व विद्युत)-७७ ही पदे भरण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात जाहिरात प्रदर्शित करून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. (BMC)
(हेही वाचा – KEM Hospital : केईएमच्या २१ मजली कर्मचारी भवनासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च)
या सर्व अर्जांची छाननी व पडताळणी झाल्यांनतर ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक महापालिकेच्या नगर अभियंता विभागाने जाहिर केले आहे. त्यानुसार येत्या ९ फेब्रुवारी रोजी दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) आणि ३ व ८ मार्च रोजी कनिष्ठ अभिंयता (स्थापत्य अर्थात सिव्हील) तसेच ९ मार्च रोजी दुय्यम अभियंता (स्थापत्य अर्थात सिव्हील) या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून या ऑनलाईन परीक्षेसाठी उदवारांना उपस्थित राहण्याकरता आवश्यक असलेले प्रवेशपत्र मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/forprospects/ Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नगर अभियंता विभागाने जाहिरातीद्वारे नमूद केले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community