मुंबईत येत्या २० जानेवारीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान, आझाद मैदान तसेच क्रॉस मैदान आदी मैदांनाचा शोध घेतला जात असला तरी प्रत्यक्षात मुंबईत होणाऱ्या या मार्चामुळे महापालिकेची दैनंदिन व्यवस्थाच कोलमडून जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मोर्चासाठी सुमारे तीन कोटी मराठा समाजाची लोकं जमा होणार असल्याचा दावा जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. त्यामुळे या मोर्चासाठी जर मोठ्याप्रमाणात लोकांनी गर्दी केल्यास याचा परिणाम महापालिकेच्या कारभारावरच होणार असून अप्रत्यक्षत महापालिकेची यंत्रणाच कोलमडून पडण्याची भीती वर्तवली जात आहे. (Manoj Jarange March)
मैदानाच्या परवानगीसाठी अद्याप अर्ज नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात येत्या २० जानेवारीला मुंबईला धडक देणार असल्याची घोषणा मराठी आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. त्यासाठी सध्या शिवाजीपार्क, आझाद मैदान आणि क्रॉस मैदानांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप तरी या पैकी कुठल्याही मैदानात मोर्चा काढण्यासाठी जरांगे (Manoj Jarange) यांच्या शिष्टमंडळाकडून अर्ज करण्यात आलेला नाही. दरम्यान जरांगे (Manoj Jarange) यांनी मैदानाची परवानगी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी करावी असे आवाहन केले आहे. (Manoj Jarange March)
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची सज्जता)
तर या विभागांवर पडणार भार
मुंबईत होणाऱ्या या मोर्चासाठी जरांगे (Manoj Jarange) यांनी येणाऱ्या लोकांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याची सूचना केली असली तरी महापालिकेच्यावतीने या फिरत्या शौचालयासह पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करावी लागते. यासोबत प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करावी लागते. (Manoj Jarange March)
मात्र, दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोर्चा साठी परवानगी दिल्यास महापालिकेच्या जी उत्तर विभागासह आसपासच्या जी दक्षिण विभागावर भार पडेल, तर आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानावर मोर्चा काढण्यास परवानगी दिल्यास महापालिकेच्या ए विभाग, बी विभागावर भर पडेल, तर बीकेसीमध्ये मोर्चा काढण्यास परवानगी दिल्यास महापालिकेच्या एच पूर्व, एच पश्चिम, एल विभाग आदींवर भार पडणार आहे. (Manoj Jarange March)
महापालिकेच्या सेवेवर याचा परिणाम होण्याची भीती
सध्या तरी कुठल्या मैदानावर मोर्चा काढला जाईल हे स्पष्ट नसले तरी येणाऱ्या गर्दीचा विचार करता तसेच यापूर्वीच्या मराठा आरक्षणाच्या र्मोचाचा विचार करता यासाठी संपूर्ण मुंबईतील फिरत्या शौचालयांची सेवा या मैदानांवर द्यावी लागेल, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरला नळ जोडून चैत्यभूमीवर ज्याप्रमाणे सेवा दिली जाते त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी जास्तीत जास्त प्लास्टिक बॉटल्सचा वापर होणार असल्याने यापासून निर्माण होणारा कचरा तसेच त्यांच्यासाठी फुड पॅकेट पुरवले जाणार असल्याने त्याचाही कचरा मोठ्याप्रमाणात होणार आहे. परंतु अद्यापही कोणत्याही मैदानावर हा मोर्चा काढून आंदोलन केले जाईल याची स्पष्ट कल्पना नसल्याने महापालिकेची तशी कोणतीच तयारी झालेली नाही. त्यामुळे यासाठी इतर विभाग कार्यालयातील सफाई कामगारांसह इतर यंत्रणांची मदत मोर्चा तथा आंदोलनाच्या ठिकाणी वापरावी लागणार आहे. त्यामुळे याचा महापालिकेच्या सेवेवर याचा परिणाम होण्याची भीती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Manoj Jarange March)
(हेही वाचा – केंद्राच्या धर्तीवर राज्यात Give It Up Subsidy चा पर्याय)
सुविधा पुरवताना महापालिकेची दमछाक होईल
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईची लोकसंख्याच दहा कोटींच्या वर असून नोकरी धंद्यानिमित्त मुंबईत कोट्यवधी लोक येत असतात. त्यातच जर मुंबईत तीन कोटी लोकांच्या तुलनेत ५० लाख ते १ कोटी जरी लोक आल्यास त्या सर्वांना शौचालयासह स्वच्छतेची आणि पिण्याची पाण्याची आणि इतर आरोग्याची सुविधा पुरवताना महापालिकेची दमछाक होईल. त्या आंदोलन काळात सेवा पुरवताना मुंबईतील इतर दैनंदिन पुरवण्यात येणाऱ्या सेवांवरही परिणाम होईल अशी भीती वर्तवली जात आहे. (Manoj Jarange March)
तारेवरची कसरत करावी लागेल
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सखोल स्वच्छता मोहिम राबवली जात असून त्यासाठी प्रत्येक शनिवारी तसेच रविवारच्या कार्यक्रमांसह वाढते धुलिकण नियंत्रण आणण्यासाठी केली जाणारी साफसफाई, पाण्याने धुतले जाणारे रस्ते, राडा रोडा उचलण्याची कार्यवाही आदींसह स्वच्छतेच्या कार्यक्रमांमुळे महापालिकेचे कर्मचारी आधीच हैराण झालेले आहे. त्यातच आता या मोर्चाचे संकट उभे राहिल्याने कर्मचाऱ्यांना सेवा अखंडित राखताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (Manoj Jarange March)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community