शिवाजी पार्कमधील ‘तो’ खड्डा बुजवला, आता चालता येणार बिनधास्त

183

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (शिवाजी पार्क) परिसरात केबलचे खोदकाम करून चर बुजवल्यानंतर त्यावर चक्क पायाच्या तळव्याच्या आकाराचा खड्डा पडल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रसिध्द केल्यानंतर अखेर सोमवारी बुटाच्या आकाराचा हा खड्डा बुजवण्यात आला. त्यामुळे खड्डा बुजवल्यामुळे शिवाजीपार्क मधील जनतेला एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. या खड्डयांमध्ये पाय जावून पायाला मुरगळून गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता असल्याने याची गंभीरता लक्षात घेत महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा खड्डा बुजवला.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरांमध्ये मागील आठवड्यात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही केबल टाकण्यासाठी मैदान परिसराच्या बाहेरील बाजूस खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम केल्यानंतर केबल टाकण्यात आली आणि केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या जागी स्टॅपिंग सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम आधीच्या कामाशी मिळते जुळते केले असले तरी या सिमेंटीकरणाचे काम झाल्यानंतर काही वेळातच फिरण्यास आलेल्या नागरिकाचा पाय त्यावर पडला आणि बुटाच्या आकाराचा शिक्का उमटावा तसा खोलवर खड्डा पडला होता. वनिता समाज हॉलसमोरील पदपथावर आणि रवि स्टॉल्सशेजारील पदपथाच्या भागात हा खड्डा पडला होता आणि याठिकाणी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांचा पाय जावून त्यांच्या पायाला इजा होण्याची भीती वर्तवली हिंदुस्थान पोस्टने वर्तवली होती.

मागील ७ मार्च रोजी हिंदुस्थान पोस्टने हे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर शनिवार व रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने याची दखल न घेणाऱ्या महापालिकेच्या जी उत्तर विभागाने सोमवारी सकाळी तातडीने याची दुरुस्ती करून हा खड्डा बुजवत नागरिकांना चालण्यास योग्य अशी पदपथ उपलब्ध करून दिली आहे.

(हेही वाचा – येत्या १ एप्रिल २०२३ पासून धूळ नियंत्रण उपाययोजनांची होणार सक्त अंमलबजावणी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.