BMC : चेंबूर, देवनार आणि परेलमधील मलवाहिनींची क्षमता वाढणार

149
BMC : चेंबूर, देवनार आणि परेलमधील मलवाहिनींची क्षमता वाढणार
BMC : चेंबूर, देवनार आणि परेलमधील मलवाहिनींची क्षमता वाढणार

मुंबईतील अनेक भागांमध्ये मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले असून आता चेंबूरमधील मैसूर कॉलनी, देवनारमधील डम्पिंग ग्राऊंड मार्गावर तसेच परेलमधील जेरबाई वाडीया मार्गावर भोईवाडा नाका ते रफी अहमद किडवाई मार्गापर्यंत १२०० मि.मी आणि ८०० मि.मी व्यासाच्या मलवाहिनी सुक्ष्म बोगदा पध्दतीने बसवण्यात येणार आहे. या मलवाहिनींमुळे लोकांची मलनि:सारण वाहिनींची समस्या कायमची दूर होईल. मुंबईतील सध्याच्या व भविष्यातील गरजा भागवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांचे आकारमान वाढवण्यात येत आहे. तसेच जिथे मलनि:सारण वाहिनी अस्तित्वात वाहिनी अस्तित्वात नाही तेथे नव्याने टाकण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. अशा कामांमध्ये वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना चालताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यावरून चर पध्दतीने टाकण्यात अनेक अडचणी येत असल्याने मायक्रोटनेलिंगचे चर विरहित तंत्रज्ञानाद्वारे मलवाहिनी टाकण्यात येत आहे.

मायक्रो टनेलिंग आणि पाईप जॅकींग ही पध्दत विशेषत: अतिशय रहदारीच्या रस्त्यांमधून आणि रेल्वे, महामार्ग, अरुंद रस्त्याखालून जमिनीवरील भागाला तसेच केबल व इतर सेवांना अडथळा न आणता वाहिन्या टाकता येतात. रहदारीने गजबजलेल्या रस्त्यावर वाहनांच्या वाहतुकीला कमीत कमी अडथळे व पादचाऱ्यांची कमीत कमी अडथळे व पादचाऱ्यांची कमीत कमी गैरसोय करून रस्त्याखालून मलनि:सारण वाहिनी टाकण्यासाठी सूक्ष्म बोगदा या पध्दतीचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये लेझर गाईडेड आणि रिमोट कंट्रोल्ड टनेलिंग शिल्ड वापर बोगदा खोदण्याचे काम व पाईप जॅकींग करण्यात येते. अशाप्रकारच्या तंत्राचा वापर करणारी मुंबई महापालिका ही भारतातील एकमेव अशी महापालिका आहे.

(हेही वाचा – Opposition Party Meeting : विरोधकांच्या बैठकीत केजरीवाल – अब्दुलांमध्ये जुंपली; ठाकरे-पवारांची मध्यस्थी)

अशा पध्दतीने मुंबईतील पूर्व उपनगरांतमध्ये म्हैसूर कॉलनी पंपिग स्टेशनपासून ते आर सी मार्गावरील १२०० मि.मी व्यासाच्या वाहिनीपर्यंत १२०० मि.मी. व्यासाच्या सुक्ष्म बोगदा पध्दतीने टाकण्यात येणार आहे. यामुळे चेंबूर मैसूर कॉलनी आरसी मागारपर्यंतच्या सभोवतालच्या परिसरातील जनतेला फायदा होणार आहे. तसेच एम पूर्व देवनार डम्पिंग ग्राऊंड मार्गावर घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्याच्या छेदन बिंदू पासून ९० फुट मार्गाच्या रोड नंबर ६च्या छेदन भागापर्यंत ८०० मि मी व्यासाच्या मलवाहिनी सुक्ष्म बोगदा पध्दतीने टाकली जाणार आहे. यामुळे शिवाजी नगर, बैगनवाडी परिसरातील नागरिकांना आता फायदा होणार असून त्यांना त्या भागातील मलनि:सारणाची समस्या कायम दूर होणार आहे.

याबरोबरच शहरातील एफ दक्षिण विभागातील जेरबाई वाडीया मार्गावर भोईवाडा नाका ते रफी अहमद किडवाई मागापर्यंत ८०० मि. मी व्यासाची मलनि:सारण वाहिनी टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर ३०० मि मी व्यासाची मलवाहिनी आहे आणि ती अपुरी आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार हे काम हाती घेण्यात येत असून जेरबाई वाडिया लगतच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या तिन्ही कामांमध्ये १८४० मीटर्स लांबीची मलवाहिनी सुक्ष्म बोगदा पध्दतीने टाकण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे विविध करांसह ६७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामांसाठी जिप्सम स्ट्रक्चरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.