अर्थसंकल्प भाग ३ : महापालिका शिक्षण विभागाला वन्यजीव आणि जैवविविधतेच्या माहितीचा विसर

152

शिक्षण विभागासाठी मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ४०० कोटींची वाढ करत ३३७०.२४ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. कोविड नंतर महापालिकेच्या शाळेत पुन्हा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गणवेश बदलले आणि  मुंबई पब्लिक स्कूलचे निर्माण केले असले तरी कोणत्याही प्रकारचे महापालिका शिक्षण विभागात बदल झालेले दिसत नाही. महापालिकेच्या शाळांमधून वन्यजीव आणि जैवविविधतेच्या माहितीकरताचा उपक्रम राबवण्याची घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात याबाबतची काही माहिती मुलांपर्यंत दिली जात नाही. अशाप्रकारचा उपक्रम महापालिकेच्या शाळांमध्ये राबवून विद्यार्थ्यांना जैव विविधतेची माहिती दिली जाणार होती, परंतु हा उपक्रम हातीच घेण्यात  आलेला नाही.

 मुंबईच्या महापालिका शाळांच्या मालकीचे एकूण ६३ मैदाने

अर्थसंकल्पामध्ये शाळांमधील भिंतीही आता बोलक्या करण्याच्या दृष्टीकोनातून नैसर्गिक चित्रांनी रंगवण्यात येणार असल्याची घोषणा केली, होती परंतु अद्यापही या भिंतीवरही चित्र रंगवली गेली नाही. महापलिकेच्या शाळांमध्ये १० हजार पॉलीमर डेस्कची काही प्रमाणात खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे शालेय इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम आता काही प्रमाणात हाती घेण्यात आली आहे तर टॅबचा पुरवठा दहावीच्या मुलांना करण्यात आला आहे. मुंबईच्या महापालिका शाळांच्या मालकीचे एकूण ६३ मैदाने आहेत. त्यातील ६३ मैदाने सुस्थितत आहेत. शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत उर्वरीत २० मैदानांपैकी चालू वर्षात ०२ मैदानांच्या विकासाचे काम सुरु असली तरी १८ मैदानांच्या विकासाची कामे अद्यापही हाती घेतलेली नाहीत. या शैक्षणिक वर्षात ५० प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ई वाचनालये सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात यालाही काही सुरुवात  झालेली नाही. विशालशील प्रयोगशाळा  तसेच  ई वाचनालये , संगणक प्रयोगशाळा अद्यावत  करणे, शाळा व्यवस्थापन माहिती यंत्रणा, शालेय इमारतींमध्ये अग्निशमन साहित्य व उपकरणांची खरेदी आदींची कामेही हाती घेण्यात आली नाहीत.

(हेही वाचा वरळीच्या टेकडीवरील उद्यान हिरवेगार राखण्यासाठी हात पडले तोकडे, म्हणून ‘यांची’ केली निवड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.