मुंबई-नागपूर प्रवास होणार वेगवान; ‘Samrudhi Highway’चा ७६ कि.मी.चा शेवटचा टप्पा खुला होणार

Samrudhi Highway चा संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे

83

समृद्धी महामार्गाचा (Samrudhi Highway) इगतपुरी (Igatpuri) ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गाची अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत.

(हेही वाचा – Teacher Recruitment : आता सर्व शाळांना मिळतील नियमित शिक्षक; कंत्राटी शिक्षक भरतीचे शासनाचे धोरण अखेर रद्द)

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या महामार्गाचा संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.

आता समृद्धी महामार्गाचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे नाशिक (Nashik) मार्गावरील वडपेपर्यंतची कनेक्टरची कामे सुरू आहेत. ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम बाकी होते. पावसाळा संपल्यानंतर एमएसआरडीसीकडून (MSRDC) ही कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. मार्चच्या सुरुवातीला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो.

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी (Nagpur to Shirdi) हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता, तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० कि.मी.चा मार्ग सुरू करण्यात आला होता. गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ किमीचा मार्ग सुरू केला होता. आता अखेरचा टप्पाही पूर्ण होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.