Mumbai Naws : मालाड मीठ चौकी जोडमार्गावर उड्डाणपूल वाहतुकीस खुला

228
Mumbai Naws : मालाड मीठ चौकी जोडमार्गावर उड्डाणपूल वाहतुकीस खुला
Mumbai Naws : मालाड मीठ चौकी जोडमार्गावर उड्डाणपूल वाहतुकीस खुला
मालाड (पश्चिम) येथील मीठ चौकी जोडमार्गावरील उड्डाणपुलाची दुसरी मार्गिका शनिवारी  खुली करण्यात आली.केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही  दुसरी मार्गिका खुली  करण्यात आली.उड्डाणपुलाची दुसरी मार्गिका (मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी मार्गिका) सुरु झाल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परिणामी, वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. हलक्या वाहनांसाठी या मार्गिकेचा वापर केला जाणार आहे. (Mumbai Naws)
Untitled design 2025 01 12T074109.342
मुंबई महानगरपालिकेने मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मीठ चौकी जंक्शनवर ‘टी’ आकाराचा उड्डाणपूल उभारला आहे. मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी मार्गिका आणि मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी मार्गिका अशी उड्डाणपुलाची रचना आहे. त्यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका  ६ ऑक्टोबर २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर, शनिवारी  ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकेची लांबी ३९० मीटर असून रुंदी ०८ मीटर आहे. (Mumbai Naws)
 केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल आज दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी उड्डाणपुलाची दुसरी मार्गिका तातडीने खुली करण्याची मागणी केली. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार शनिवारी या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे अनौपचारीक लोकार्पण करण्यात आले. सहाय्यक आयुक्त (पी उत्तर)  किरण दिघावकर यांच्यासह स्थानिक मान्यवर, नागरिक देखील यावेळी उपस्थित होते. (Mumbai Naws)
Untitled design 2025 01 12T074103.196
या उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ५५ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. दहिसर ते अंधेरी (पश्चिम) मेट्रो – २ च्‍या उन्‍नत मार्गामुळे महानगरपालिकेने बांधलेल्‍या उड्डाणपुलाच्‍या उंचीवर मर्यादा आल्‍या आहेत. परिणामी हलक्‍या वाहनांसाठीच या उड्डाणपुलाच्‍या मार्गिकेचा वापर केला जाणार आहे. या पुलाच्या केवळ रंग रांगोटीचे काम शिल्लक असून  उर्वरित वाहतुकीचे काम पूर्ण झाल्याने ही मार्गिका खुली करण्यात आली. तर रंग रंगोटीचे काम रात्रीच्या वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. (Mumbai Naws)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.