महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गांजा या अमली पदार्थाची डिलेव्हरी देण्यासाठी हैद्राबाद येथून निघालेल्या गांजाने भरलेले ट्रक मराठवाड्यातील नांदेड येथे ताब्यात घेण्यात आला आहे. हि कारवाई एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने सोमवारी केली आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर एनसीबीची राज्यातील हि सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. एनसीबी याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून दोघाजवळून एका ट्रकसह ११२७ किलो गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
ट्रक चालकासह दोघांना अटक
हैद्राबाद येथून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये मराठवाडा मार्गे एका ट्रक मधून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीचे पथकाने या मार्गावर पाळत ठेवून सोमवारी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका मांजराम या ठिकाणी एनसीबीच्या अधिकाऱ्यानी संशयास्पद ट्रक थांबवला. या ट्रॅकची झडती घेण्यात आली असता लोखंडी सळईच्या खाली गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाचे पाकिटे मिळून आली. एनसीबीने ट्रक चालकासह दोघांना अटक केली असून सुमारे ११२७ किलो गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
मुबई एनसीबी विभागाची सर्वात मोठी कारवाई
हा गांजा आंध्रप्रदेश येथून हैद्राबाद मार्गे महाराष्ट्रात आला होता, या ट्रक जळगाव जिल्ह्यात जाणार होता त्या ठिकाणी गांजाची डिलेव्हरी दिल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात गांजाचे वितरण करण्यात येणार होते तेथून हा गांजा मुंबई आणि ठाण्यात येणार होता अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. क्रूझ ड्रग प्रकरणानंतर मुबई एनसीबी विभागाची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली आहे.
(हेही वाचा फेसबुक उघडलं तर बसेल कानाखाली!)