Aarey Metro Carshed: आरे कॉलनी मार्गावरील वाहतूक 24 तासांसाठी बंद, असा असणार पर्यायी मार्ग

100

मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाक्याला जोडणारा आरे कॉलनीतील मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे. सोमवारी, गोरेगाव चेक नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी २४ तास बंद असणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी ट्विट करत मुंबईकरांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका (MCGM) आणि मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

हा मार्ग राहणार बंद

दिंडोशी वाहतूक विभागांतर्गत आरे कॉलनीतील रस्त्यांवर वाहतुक कोंडींची समस्या उद्भवू नये, म्हणून सोमवारच्या रात्री १२ वाजेपासून पुढील २४ तास वाहन चालक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरे रोडवरील दोन्ही बाजूने होणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

(हेही वाचा- बेस्ट बसच्या मार्गिकेत बदल; ‘या’ मार्गावर वळवण्यात आली वाहतूक)

https://twitter.com/MTPHereToHelp/status/1551424319557107712?s=20&t=DEX21wXugqutttoDDqF40g

या पर्यायी मार्गाचा करा वापर

आरे जंक्शन कडून पवई आणि मरोळकडे जाणाऱ्या नागरीक आणि वाहन चालकांनी जेव्हीएलआर रोडचा वापर करावा. तसेच पवई आणि मरोळ कडून येणाऱ्या वाहन चालकांनी जेव्हीएलआर रोडचा वापर करावा. तर आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकरिता आरे रोड वापरास मुभा देण्यात आली आहे.

मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाक्याला जोडणारा आरे कॉलनीमधला मुख्य मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत असली तरी केलेल्या वाहतूक मार्गाच्या बदलाची व व्यवस्थेची नोंद घ्यावी आणि वाहतूक नियमन व नियंत्रणामध्ये पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांना करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.