सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याविरोधात आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तृतीयपंथीयांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. तृतीयपंथीयांनी केंद्र सरकारच्या कारवाईचा निषेध केला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तृतीयपंथीयांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पोलिसांनी तृतीयपंथीयांचा मोर्चा अडवत त्यांना ताब्यात घेतले. तृतीयपंथी ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार होते, पण अचानक त्यांनी आपला मोर्चा भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या दिशेने वळवला. भाजप कार्यालयात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोर्चा काढणाऱ्या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.
(हेही वाचा श्रीमद्भगवद्गीताला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्या! हिंदु राष्ट्र संसदेत ठराव)
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सलग तीन दिवस चौकशी करत आहेत. राहुल गांधी यांची तीन दिवस 30 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांची बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली.