मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर ‘या’ मेट्रो स्थानकांच्या नावात बदल

110

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( MMRDA) मेट्रो २ अ च्या टप्प्यामधील दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डी.एन. नगर मार्गिकेवरील तीन स्थानकांची नाव बदललेली आहेत.

( हेही वाचा : “बंड करून ९ महिने झाले आता आम्हाला विसरा… नव्याने पक्षबांधणी करा”, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंवर निशाणा)

पहाडी एकसर, वळनई आणि पहाडी गोरेगाव या स्थानकांची नाव बदलून पहाडी एकसरचे या मेट्रो स्थानकाचे नाव शिंपोली, वळनईचे नाव वळनई मीठ चौकी तर पहाडी गोरेगावचे नाव बदलून बांगूर नगर असे नामकरण करण्यात आले आहे.

नावे का बदलण्यात आली?

नागरिकांच्या मागणीमुळे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नव्याने नामकरण केलेल्या या स्थानकांना पूर्वी पासून याच नावांनी ओळखले जाते. तसेच पहाडी एकसर, वळनई आणि पहाडी गोरेगाव ही आधीची नावे गोंधळात टाकणारी आणि सरकारी नोंदी, कागदपत्रांसाठी आहेत, प्रत्यक्षात या नावांनी स्थानकांना कोणी ओळखत नसल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान मार्च २०२२ मध्ये दहिसरच्या स्थानिक लोकांनी केलेल्या मागणीमुळे MMRDA ने अप्पर दहिसर चे नाव बदलून आनंद नगर करण्यात केले होते. गेल्याच वर्षी या टप्प्यातील दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गिका सुरू करण्यात आली आणि जानेवारीमध्ये अंधेरी (डी.एन. नगर ) मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले होते. तत्त्वनिष्ठ दृष्टीने जर नाव बदलण्याची मागणी योग्य असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल असे MMRDA कडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.