मुंबईला धोक्याची घंटा.. या असुरक्षित प्रभागांमध्ये तुम्ही तर येत नाहीत ना?

116

जागतिक तापमान वाढीमुळे गेल्या 47 वर्षांत मुंबईच्या तापमानात 0.25 अंश सेल्सिअसची प्रतिदशक वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून समोर आली आहे. तसेच, शहरातील प्रदूषण वाढत आहे. सोबतच पूरप्रवण क्षेत्र तसेच भूस्खलनाच्या घटनांमध्ये गेल्या दशकात झालेली वाढ ही चिंताजनक आहे.

35 टक्के मुंबईकर प्रभावाखाली

मुंबई महापालिकेने वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया आणि सी-४० सिटीज नेटवर्क यांच्या तांत्रिक सहाय्याने पहिला मुंबई वातावरण कृती आराखडा (एमकॅप) मांडला. यात ग्लोबल वॉर्मिंगचा फटका मुंबईच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या कांदळवनांना बसल्याचे समोर आले आहे. सॅटेलाईट इमेजवरील विश्लेषणाच्या आधारे 2005 ते 2021 या कालावधीत 325 हेक्टरवरील कांदळवनांचे घनदाट आच्छादन आता विरळ झाले आहे. बऱ्याच ठिकाणी धूप झाल्याने भरती-ओहोटी क्षेत्रातील चिखलक्षेत्रात बदल झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईला वेगवेगळ्या प्रकारच्या पुराचा धोकादेखील वाढला आहे. पालिकेने नोंदवलेल्या फ्लडिंग हॉटस्पॉटच्या प्रभावाखाली  35 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राहते.

( हेही वाचा :‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद? )

‘हे’ आहेत असुरक्षित प्रभाग

  • एम पूर्व प्रभाग उष्णतावाढीच्या अनुषंगाने सर्वाधिक असुरक्षित विभाग असून, 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पृष्ठभागावरील 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचा सामना करावा लागत आहे.
  • एफ उत्तर प्रभागामध्ये 54 फ्लडिंग हाॅटस्पाॅट असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये 287 भूस्खलनप्रवण ठिकाणे असून त्यापैकी 209 ठिकाणच्या वसाहती या अस्थिर संरचनेच्या आणि असुरक्षितता वाढवणा-या आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.