मुंबईवर मानवरहित विमान वा ड्रोनच्या साह्याने हवाई हल्ला होण्याची भीती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलली आहेत. मुंबईच्या आभाळात ड्रोन, रिमोट मिसाइल, पॅराग्लायडिंगला पूर्णपणे बंदी राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असून या आदेशाचं उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आयपीसी कलम १४४अन्वये कारवाई केली जाणार असल्याचं आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. (Mumbai)
राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणांना मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. सामान्य जनतेला आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश देण्यात आले आहेत. (Mumbai )
(हेही वाचा : Aaditya L-1 : कधी पोहचणार इस्रो प्रमुखांनी दिली अपडेट)
मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त,बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी उड्डाण अपवाद राहील.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community