Mumbai Police : मुंबईतील १५० पोलीस निरीक्षक निघाले जिल्ह्याबाहेर

60
Mumbai Police : मुंबईतील १५० पोलीस निरीक्षक निघाले जिल्ह्याबाहेर
Mumbai Police : मुंबईतील १५० पोलीस निरीक्षक निघाले जिल्ह्याबाहेर

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आलेल्या आहेत, मागील महिन्याभरात एकट्या मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षका पासून पोलिस निरीक्षक पर्यत जवळपास १५० पोलिसांच्या बदल्या मुंबईच्या बाहेर करण्यात आलेल्या आहेत. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सर्व पोलिसांनी मुंबईतील कार्यभार सोडून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघाले आहे.

(हेही वाचा – MP Arvind Sawant यांनी मागितली ‘त्या’ विधानावरून शायना एनसी यांची माफी)

निवडणूक आयोगाने राज्यात विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाह्य बदल्या केल्या, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबईतील पोलीस (Mumbai Police) निरीक्षकांच्या बदल्यांनी पोलीस दलावर मानसिक दबाव वाढला आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्र सुरू झाले होते.

(हेही वाचा – Bangladesh मध्ये हिंदूवर देशद्रोहाचे गुन्हे; हंगामी सरकारकडून दडपशाहीचा डाव)

पोलीस दलातील बदल्याचा सर्वात अधिक परिणाम मुंबई पोलीस दलात दिसुन आला आहे, मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात झालेल्या अंतर्गत बडल्या नंतर दोन महिन्यात य पोलीस अधिकाऱ्यांच्या मुंबईच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या, त्यादेखील नागपूर, गोंदिया, अकोला, इत्यादी जिल्ह्यामध्ये बदल्या करण्यात आल्या असल्यामुळे नाराजी पसरली आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकारी यांना शुक्रवारी कार्यमुक्त होण्याचे आदेश प्राप्त झाले, बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. शुक्रवारी मुंबईतील दीडशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी कार्यभार सोडून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.