आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे, या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने नेते मंडळी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत, मात्र वाहन पार्किंगची समस्या बघता, मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Police) कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर न करता लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसचा वापर करावा असे आवाहन केले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Police) आवाहनानंतर शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी नेतेमंडळी कार्यकर्त्यासोबत ट्रेनमधून प्रवास करतील का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) या ठिकाणी ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्याच्या नवीन सरकार मधील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा होणार आहे. हा सोहळा दुपारी १२ वाजता सुरू होणार असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाजपा तसेच महायुतीचे नेते, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. त्याच बरोबर विविध राज्यातील मुख्यमंत्री (Chief Minister) देखील या सोहळ्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) मोठ्या प्रमाणात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मांदियाळी पहायला मिळणार आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis यांचे विधीमंडळ पक्षनेते म्हणुन निवड झाल्यानंतर विधानभवनात भाषण; म्हणाले…)
पोलिस सूत्रांच्या आकडेवारी नुसार या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास ५० ते ६० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे, यावेळी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंगची समस्या निर्माण होणार असल्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्याची वाहतूक प्रवाह आणि लोकांची गैरसोय कमी करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक नियम लागू करण्यात आले आहे,आझाद मैदानावर (Azad Maidan) पार्किंगची सुविधा नसल्यामुळे, लोकांना सार्वजनिक वाहतूक, विशेषतः लोकल ट्रेनचा वापर करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. पोलिसांच्या विनंती नंतर भाजपाचे नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यसह ट्रेन ने प्रवास करून सोहळ्यासाठी उपस्थित राहतील का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
५ नोव्हेंबर रोजी वाहतुकीचे नियोजन …..
- गुरुवारी या कालावधीत अनेक मार्ग नो-एंट्री झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात मोठा मेळावा अपेक्षित असल्याने मुंबई पोलिसांनी जनतेला त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
- सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) – दोन्ही दिशांना वाहतुकीस बंदी असेल.
- चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) या दोन्ही हद्दीतील वाहतुकीस बंदी असेल.
- महापालिका मार्ग – सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दोन्ही दिशेला वाहतुकीस बंदी असेल.
- चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) ते CSMT जंक्शन – रहदारीला मनाई असेल.
- मेघदूत ब्रिज (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) [दक्षिण बाउंड] – एनएस रोड आणि कोस्टल रोडकडून शामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक प्रतिबंधित असेल.रामभाऊ साळगावकर रस्ता (एकमार्गी) – इंदू क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक) ते व्होल्गा चौक हा रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला असेल.
(हेही वाचा – Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी गडचिरोली हादरलं! कुठे जाणवले धक्के ?)
पर्यायी मार्ग
- LT मार्ग – चकाला जंक्शन – उजवे वळण – DN रोड – CSMT जंक्शन – इच्छित स्थळाकडे आणि त्याउलट.
- महर्षी कर्वे रोड – इच्छित स्थळी.
- चाफेकर बंधू चौक (OCS जंक्शन) – हुतात्मा चौक – काळाघोडा – के दुभाष मार्ग – शहीद भगतसिंग मार्ग – इच्छित स्थळी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community