Holi, रंगपंचमीला मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर ; ‘ती’ गाणी वाजवाल तर खबरदार…

Holi, रंगपंचमीला मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर ; 'ती' गाणी वाजवाल तर खबरदार…

105
Holi, रंगपंचमीला मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर ; 'ती' गाणी वाजवाल तर खबरदार…
Holi, रंगपंचमीला मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर ; 'ती' गाणी वाजवाल तर खबरदार…

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) होळी, (Holi) रंगपंचमीसाठी (Rangpanchami) कडक नियमावली जाहीर केली आहे. 12 मार्च ते 18 मार्च 2025 पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. येत्या १३ मार्च आणि १४ मार्च या दोन्हीही दिवशी होळी आणि धुलिवंदन साजरा केला जाणर आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून नुकतंचे एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. यात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. (Holi)

हेही वाचा-WFI Ban Lifted : क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशनवरील बंदी हटवली, संजय सिंग यांच्याकडे सूत्र

यानुसार, अश्लील शब्दातील गाणी गाण्यांवर प्रतिबंध असणार आहे. तसेच अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Holi)

प्रसिद्धीपत्रकात काय?
होळी (Holi) , धुलीवंदन आणि रंगपंचमी सण १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत साजरा केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. मी सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी येथे नमूद केलेल्या काही कृत्यांना प्रतिबंधित करणे आवश्यक मानतो. त्यानुसार, पोलीस उपआयुक्त अकबर पठाण यांनी काही नियमावली जारी केली आहेत. (Holi)

हेही वाचा-Manipur मध्ये BSF जवानांचे वाहन दरीत कोसळले : 3 हुतात्मा, तर 13 जण जखमी

१. अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे.
२. हावभाव किंवा नक्कलचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते.
३. पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.
४. रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा फेकणे.

हेही वाचा-PM Narendra Modi मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय !

जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाईल. हे आदेश १२ मार्च २०२५ रोजी ००.०१ ते दि. १८ मार्च २०२५ च्या २४.०० वाजेपर्यंत लागू असणार आहेत. तसेच होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते. (Holi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.