भाड्याने घर दिलंय? मग भाडेकरुंबाबत मुंबई पोलिसांनी केलंय महत्वाचं आवाहन, लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम

146

तुम्ही घर किंवा गाळा भाड्याने दिला आहे तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या कोणत्याही मालमत्तेचा किंवा घराचा व्यवसाय करणा-यांसाठी प्रत्येक घर किंवा मालमत्तेच्या मालकाने जर आपले घर किंवा जागा भाड्याने दिली असल्यास, त्या भाडेकरुंचा संपूर्ण तपशील https://mumbaipolice.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन कळवण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयाने एका परिपत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

पोलिसांचे आदेश

जर एखाद्या परदेशी व्यक्तीला आपले घर किंवा जागा भाड्याने दिली असल्यास त्या व्यक्तीचे नाव,राष्ट्रीयत्व,पासपोर्ट आणि व्हिसाचे सर्व तपशील देणे आवश्यक आहे. हा आदेश 6 नोव्हेंबरपासून अंमलात येणार असून 4 जानेवारी 2023 पर्यंत तो लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांना भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असेही पोलिसांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः EPF Pension Scheme 2014: EPF पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! कोट्यवधी कर्मचा-यांना होणार फायदा)

असे द्या तपशील

पासपोर्टच्या तपशीलामध्ये पासपोर्ट क्रमांक,ठिकाण आणि पासपोर्ट जारी करण्याची तारीख आणि वैधता याबाबतची माहिती सादर करावी लागेल. तसेच व्हिसाच्या तपशीलांमध्ये व्हिसा क्रमांक,श्रेणी,ठिकाण आणि जारी करण्याची तारीख,शहरात राहण्याचे कारण याबाबतची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.