ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्याच्या मुलाला अटक!

ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शनसमोर आल्यानंतर अनेक कलाकारांची चौकशी एनसीबीने केली. त्यानंतर काही कलाकारांना अटकही करण्यात आली होती. याच ड्रग्ज प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एका अभिनेत्याच्या मुलाला अटक केली आहे. 

35 ग्रॅम एमडी ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल मुंबई पोलिसांच्या अँन्टी नारकोटिक्स सेल (Anti Narcotic Cell) ने ताब्यात घेतला असता त्याच्या व्हाट्सपवर ध्रुव ताहील यांच्या सोबतचे संभाषण ANC च्या हाती लागले, ज्यात तो वारंवार ड्रग्सची मागणी करत होता. ध्रुव याने ड्रग्ससाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले होते, असे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक केली.

ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक कलाकारांची चौकशी एनसीबीने केली त्यानंतर काही कलाकारांना अटकही करण्यात आली होती. याच ड्रग्ज प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एका अभिनेत्याच्या मुलाला अटक केली आहे.

(हेही वाचा : २० रुपयांसाठी चिमुकले हात करत आहेत १ हजार स्ट्रीपची पॅकिंग!)

अशी केली पोलिसांनी कारवाई

आरोपी मुजमिल याचा मोबाइल तपासला असता त्याचे ध्रुव ताहील याच्यासोबत मेसेजेस आल्याचे समोर आले. मेसेजनुसार ध्रुव हा वारंवार ड्रग्जची मागणी करत होता आणि त्यासाठी आरोपी मुजमिल याला ध्रुवने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले असल्याची माहिती तपासात समोर आली त्यानंतर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here