‘टायगर’ची ‘दिशा’ चुकली!

टायगर आणि दिशा हे दोघे विनाकारण वांद्रे बँडस्टँड येथे वाहनातून फिरत होते.

बॉलिवूड अभिनेते टायगर श्रॉफ आणि दिशा पटणी यांच्यावर कोरोना महामारी प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

विनाकारण वांद्रे बँडस्टँड येथे वाहनातून फिरत होते!

टायगर आणि दिशा हे दोघे बुधवारी दुपारी २ वाजता विनाकारण वांद्रे बँडस्टँड येथे वाहनातून फिरतांना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांना फिरण्याचे कारण विचारले, मात्र दोघांकडे सांगण्यासारखे ठोस कारण नसल्यामुळे त्यांनी कोरोना काळात लावण्यात आलेल्या निर्बंध मोडल्याप्रकरणी कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात मागील वर्षभरापासून राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावलेले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने पोलिसांना दिलेले आहेत. महामारी कायदा तसेच जमाव बंदीचा आदेश मोडणे, शासनाने लावून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे या अंतर्गत राज्यभरात मागील वर्षभरापासून गुन्हे दाखल करण्यात येत आहे.

(हेही वाचा : शिवसेनेचे ‘ते’ सध्या काय करतात?)

मागील पाच महिन्यांत गुन्ह्यात वाढ! 

मागील वर्षभरात राज्यात लाखोंच्या संख्येने गुन्हे दाखल झालेले आहेत. गेल्यावर्षी यापैकी हजारोच्या संख्येने गुन्हे न्यायालयाने निकाली काढले असून त्यापैकी अनेकांना द्रव्य दंडाची शिक्षा करण्यात आली असून अनेकांना महिनाभराची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. न्यायालयाकडून या गुन्ह्यातील गंभीरता बघून शिक्षा सुनावण्यात आलेली आहेत. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर मागील पाच महिन्यांत या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here