मुंबई पोलिसांचे अपयश : वाहनांकरता  कलरकोड  व्यवस्था रद्द!

रविवारी, 18 एप्रिल रोजी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वाहनांवर कलरकोड स्टिकर लावण्याचे आदेश दिले होते.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहनांची गर्दी कमी व्हावी याकरता वाहनांना कलरकोडचे स्टिकर  पद्धत अवलंबली होती, मात्र काही दिवसांतच पोलिसांना ही व्यवस्था विशेष परिणामकारक असल्याचे आढळून आले नाही, त्यामुळे पोलिसांनी  ही व्यवस्था रद्द केली.

आठवड्यातच आदेश मागे 

रविवारी, 18 एप्रिल रोजी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वाहनांवर कलरकोड स्टिकर लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर काही ठराविक रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता मुंबईत कलरकोड स्टिकर लावणे बंधनकारक नाही, असे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

(हेही वाचा : उशिरा सुचलेले शहाणपण! सर्व रुग्णालयांचे फायर-ऑक्सिजन ऑडीट करण्याचे आदेश)

कलरकोड पध्दत बंद करण्याचे कारण काय?

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र मुंबईतील वाहनांची वर्दळ कायम होती. यामुळे ही पद्धत सुरु करण्यात आली होती. यानुसार अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम पाहायला मिळत होता. कोणत्या रंगाचा स्टिकर वाहनाला लावायचा याबाबत अनेकजण गोंधळले होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना याबाबत अनेक सवालही विचारण्यात आले होते. यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा या तीन रंगाचे स्टिकर त्या त्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांची ओळख म्हणून ठरवून दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here