मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सोसायट्यांमधील रहिवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईच्या सोसायट्यांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करुन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक स्वतंत्र अधिकारी असेल अशी घोषणा पांडे यांनी केली आहे. त्यामुळे आता आपल्याला रहिवाशांच्या तक्रारी जलदरित्या सोडवण्यास मदत होणार आहे.
(हेही वाचाः मराठमोळ्या माणसाच्या सहीमुळे पाकिस्तानात नोटांना ‘किंमत’ होती, बघा कशी होती नोट)
विशेष अधिकारी नेमणार
रविवारी मुंबईतील विविध प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून चर्चा केली. घाटकोपर येथील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी पोलिस स्टेशनला संस्थेच्या अध्यक्षाविरोधात तक्रार केली होती. अध्यक्षाने अपशब्द वापरल्यानंतर रहिवाशांनी पोलिस स्टेशनमेध्ये धाव घेतली होती. या तक्रारीनंतर पांडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सोसायट्यांमधील रहिवाशांची गा-हाणी ऐकण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमल्यामुळे रहिवाशांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्यास मोठी मदत होईल, असेही पांडे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः RBI ने पाकिस्तानसाठी काम केले, कधी आणि का?)
(हेही वाचाः केतकीची ‘ती’ पोस्ट 2020 मध्येच झाली होती व्हायरल? तपासात माहिती समोर)
सिटीझन फोरम तयार करणार
तसेच मुंबईकरांसाठी सिटीझन फोरम तयार करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यासाठी mumbaicf.in नावाची एक वेबसाईट देखील बनवण्याक आली आहे. या वेबसाईटला भेट देऊन मुंबईकरांनी आपल्या सूचना कळवाव्यात, असे आवाहन संजय पांडे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community