मुंबई पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेच्या अंतर्गत हरवलेल्या बालकांपैकी एका महिन्यात १४५ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
काय आहे ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम?
मुंबईतून दरदिवशी अनेक बालके हरवतात, त्यातील अनेक मुले रागावून घर सोडून निघून जातात. घर सोडून जाणारी तसेच घरातून रागावून भराबाहेर पडणारी ही मुले असामाजिक घटकांच्या हाती लागू नयेत, यासाठी या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या सामाजिक संस्था, गैरसरकरी संस्थांच्या मदतीने मुंबई पोलिसांकडून हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात येतो.
(हेही वाचाः न्युमोनियासह न्युमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी बालकांना देणार पीसीव्ही लस)
मुलींची संख्या जास्त
जून महिन्यात मुंबई पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेच्या अंतर्गत १४५ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वाधिक संख्या ही मुलींची आहे. शोध घेण्यात आलेली ही सर्व मुले १ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन या मुलांचा ताबा त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community