सध्या ऑनलाईन वेबसाईट आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे शॉपिंगपासून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण या वेबसाईटचा वापर करणे अनेकदा महागात पडू शकते. सायबर गुन्हेगारांकडून अनेकदा ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येते. फसव्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेकदा ग्राहकांना फार मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो.
याची दखल घेत आता मुंबई पोलिसांनी या फसव्या वेबसाईट ओळण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. तसेच अशा बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.
1. URL कडे काळजीपूर्वक लक्ष द्या
एखाद्या नवीन वेबसाईटवर विझिट करण्यापूर्वी त्या वेबसाईटचे URL नीट तपासून घ्या. या URL वरुन आपल्याला बनावट वेबसाईट ओळखता येते. फसव्या आणि बनावट वेबसाईटच्या URL मध्ये एखादं अक्षर किंवा शब्द जास्त असतो.
2. वेबसाईटवर माहिती टाकताना सावध रहा
http वेबसाईटवर अजिबात विश्वास ठेऊ नका. त्यामुळे अशा वेबसाईटवर स्वतःची वैयक्तिक माहिती सेव्ह करू नका. http पेक्षा https वेबसाईट या सुरक्षित असतात.
3. ट्रस्ट सील तपासून घ्या
कुठल्याही अधिकृत वेबसाईटला एक ट्रस्ट सील असतो. या ट्र्स्ट सीलवरुन अधिकृत वेबसाईट ओळखणे सोपे असते. हे ट्रस्ट सील्स होम,लॉग इन आणि चेकआऊट पेजवर उपलब्ध असतात. या ट्रस्ट सील तपासून घेतल्यास ग्राहकांची फसवणूक होत नाही.
फसव्या आणि बनावट वेबसाइट निर्धारित करण्याचे मार्ग –
#CyberCrime
#CyberSafeMumbai pic.twitter.com/S4rf3gWVih— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 11, 2022
4. वेबसाईट सर्टिफिकेट डिटेल्स तपासा
नवीन वेबसाईट वापरताना वेबसाईटच्या सर्टिफिकेटचा तपशील नीट तपासा. यामुळे वेबसाईट बनावट आहे की अधिकृत हे आपल्याला समजू शकते.
5. सुरक्षित ब्राऊझिंग करा
ब्राऊझिंग करताना आपला वेब ब्राऊझर वेबसाईटच्या संभाव्य धोक्याबाबत इशारा देत असतो. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
पोलिसांनी दिला हेल्पलाईन नंबर
या टिप्ससोबतच सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी हेल्पलाईन नंबर देखील दिला आहे. 1930 या हेल्पलाईन नंबरवर फोन करुन तसेच https://cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नागरिक तक्रार नोंदवू शकतात.
Join Our WhatsApp Community