मुंबईत आता पोलिसांना 8 तास ड्युटी

98

मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या  8 तास ड्युटीपाठोपाठ आता पोलीस अंमलदार आणि अधिका-यांच्या 8 तास ड्यूटीचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांकडून हिरवा झेंडा मिळाल्यामुळे लवकरच 50 वर्षांखालील पोलिसांना 8 तास, तर 50 वर्षांपुढील पोलिसांसाठी 12/24 चा फाॅर्म्युला लागू करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचे आदेश निघणार असल्याचे आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.

अधिका-यांकडे विचारणा

संजय पांडे यांनी आयुक्तपदी आल्यानंतर, महिला पोलिसांच्या ड्यूटीचे तास 8  करणा-या निर्णयाची अंमलबजावणी  केली होती. या पाठोपाठ आता आयुक्त संजय पांडे यांनी  मुंबई पोलीस दलातील अंमलदार आणि अधिका-यांनाही 8 तास ड्युटी करण्याबाबतची मागणी वाढली. आयुक्तांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत अधिका-यांकडे विचारणाही केली होती.

( हेही वाचा: संपूर्ण भारतावर राज्य करणा-या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक एक भारतीय आहे )

साहेब आमच्या 8 तासांचे काय ?

महिलादिनी मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या 8 तास ड्युटीचा निर्णय घेण्यात आला.  मात्र, सशस्त्र पोलीस दलातील महिलांना अद्याप 8 तास ड्युटीचा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा न्याय का? असा सवाल सशस्त्र दलातील महिला पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.