पुण्यातील पोर्शे कारच्या घटनेनंतर  Mumbai Police अॅक्शन मोडवर ; नेमकी कारवाई काय करणार? पोलिस अधिकाऱ्यांनी दिली माहिती

221
पुण्यातील पोर्शे कारच्या घटनेनंतर  Mumbai Police अॅक्शन मोडवर ; नेमकी कारवाई काय करणार ? पोलिस अधिकाऱ्यांनी दिली माहिती

महाराष्ट्रातील पुणे येथे ड्रंक अँड ड्राइव्ह (Drunk and Drive Pune) ही घटना १९ मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले, त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणावर चारही बाजूने टीका करण्यात येत आहे. संबंधीत प्रकरणांनातर मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आली असून, रविवारी व सोमवारी बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या ५० हॉटेल आणि पबवर कारवाई (Action against 50 hotels and pubs) केली. असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  (Mumbai Police)

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway: मंगळवारी पुन्हा एक तासांचा ब्लॉक, वाहतुकीला पर्याय कोणता?)

रविवारी आणि सोमवारी पोलिसांनी एकूण ५० बार आणि पबवर छापे टाकले. यामध्ये मुंबईतील पवई परिसरातील एका बारच्या व्यवस्थापक आणि वेटरवर एका अल्पवयीन मुलीला दारू दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. \

(हेही वाचा – Pune Accident: पुण्यात ट्रकची दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना जोरदार धडक, २ जणांचा मृत्यू, १ जखमी )

एका रात्रीत ६९ हजार रुपयांची दारू प्यायली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूर्वी मित्रांसोबत कोझी पबमध्ये गेला होता. रात्री १२ वाजल्यानंतर तिथे ड्रिंक्स देणे बंद झाल्यावर तो मैत्रिणींसोबत मॅरियट पबला गेला. जाण्यापूर्वी त्यांनी पबमध्ये ६९ हजार रुपयांचे बिल दिले. त्यानंतर मॅरियट पबमध्येही त्याने २१ हजार रुपयांची दारू प्यायली. आपल्या अल्पवयीन मुलाला कारची चावी दिल्याप्रकरणी बिल्डर विशाल अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विशालने पोलिसांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. (Mumbai Police)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.