Mumbai Police : लोकसभा निवडणुकीचे वेतन १० वर्षांनी पोलिसांच्या खात्यात

देशातील प्रत्येक निवडणुका मध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड करून त्यांना निवडणुकांच्या कामात जुंपले जाते, त्या कामाचा मोबदला म्हणून प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी यांना त्यांच्या वेतन व्यतिरिक्त निवडणूक भत्ता देण्याची तरदूत निवडणूक आयोगाकडून करण्यात येते.

897
सराईत ड्रग्ज तस्कर स्थानबद्ध; Mumbai Police दलातील पहिलीच कारवाई
लोकसभा २०१४ मध्ये निवडणूक (Lok Sabha Elections 2024) ड्युटी करणाऱ्या पोलिसांना तब्बल १० वर्षांनी एक महिन्याचे वेतन देण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील जवळपास १,२४१ पोलिसांना ३ कोटी ८६ लाख ३३ हजार रुपयांचे वेतन वाटप करण्यात येणार असून यामध्ये पोलीस आयुक्तापासून पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) प्रथमच निवडणुकीच्या कामाचे एक महिण्याचे वेतन मिळत आहे, ते देखील १० वर्षांनी मिळत असून त्यात अनेक अधिकारी निवृत्त झालेले आहे असल्याचे पोलिस अधिकारी यांनी म्हटले आहे. (Mumbai Police)
देशातील प्रत्येक निवडणुका मध्ये सरकारी अधिकारी (Government officials) आणि कर्मचारी यांची निवड करून त्यांना निवडणुकांच्या कामात जुंपले जाते, त्या कामाचा मोबदला म्हणून प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी यांना त्यांच्या वेतन व्यतिरिक्त निवडणूक भत्ता देण्याची तरदूत निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी प्रमाणे पोलीस यंत्रणाना देखील निवडणुकीच्या कामात जुंपले जात असून त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी यांच्या सह पोलीस अंमलदार असे १० ते १२ जणांची निवडणुकीच्या कामासाठी निवड केली जाते. (Mumbai Police)
निवड करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी (police officer) आणि कर्मचारी हे निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून निवडणुकांचे निकाल जाहीर लागेपर्यत आपल्या हद्दीतील निवडणूक संदर्भात प्रत्येक अपडेट निवडणूक आयोगापर्यत पोहचविण्याची जवाबदारी या पथकावर असते. लोकसभा असो विधानसभा असो अथवा महानगर पालिकेच्या निवडणूका असो प्रत्येक निवडणुकीत ही यंत्रणा काम करते. या विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची नोंद निवडणूक आयोगाकडे असते, या निवडणूक विशेष पथकाला मानधन स्वरूपात एका महिण्याचे मूळ वेतन देण्याची तरतूद निवडणूक आयोगाने केलेली असते. (Mumbai Police)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) काम करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील १,२४१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे तब्बल दहा वर्षांनी वेतन काढण्यात आले आहे.१,२४१ जणांच्या यादीत पोलीस आयुक्त, सह पोलिसआयुक्त, पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार यांना एक महिन्याचे मूळ वेतन देण्यात आले आहे.ही रक्कम  ३ कोटी ८६ लाख ३३ हजार रुपयांच्या घरात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वेतन तब्बल दहा वर्षांनी देण्यात येत असल्यामुळे हे वेतन येण्यास एवढा उशीर का लागतो असा प्रश्न काही अधिकारी आणि कर्मचारी विचारत आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) काम करणारे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाले आहे. एका अधिकारी यांनी सांगितले की, निवडणुकीत काम करणाऱ्या पोलिसांना मूळ वेतन देणे ही तरदूत आहे, २०१९च्या लोकसभा निवडणूक कामाचे वेतन वेळेत मिळाले होते, यंदा पोलिसांचा विचार केला गेला आहे, यापूर्वी पोलिसांचा विचार कधीच करण्यात आला नाही. यंदा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेतन काढण्यात आले त्याला ही दहा वर्षे वाट बघावी लागली असे अधिकारी यांनी म्हटले आहे. (Mumbai Police)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.