‘गणेशोत्सव’ मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, संपूर्ण राज्याभरातून तसेच राज्याच्या बाहेरून लाखोंच्या संख्येने गणेशभक्त या उत्सवात सामील होत असतात.गणेशोत्सवाला काही दिवसच उरलेले असताना मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. काळाचौकी, परळ,लालबाग ,गिरगाव हे परिसर गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू मानले जात असताना येथील पोलीस ठाण्यासह मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे.मुंबईतील ३० सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सह ४५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ७ हजार ९०० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह पोलिस अमलदारांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. (Mumbai Police)
मुंबईसह राज्य पोलीस दलात महिन्याभरापासून बढती आणि बदल्यांचे सत्र सुरू आहे. राज्यात गेल्या महिण्यात जवळपास २०० पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आलेली होती. मात्र त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नव्हते. अनेक महिन्यापासून मुंबई पोलीस दलातील अधिकारी,पोलीस अंमलदार बदलीच्या प्रतीक्षेत होते, परंतु गणेशोत्सवाला काही दिवस उरलेले असतांना मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. (Mumbai Police)
३० सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सह ४५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ७ हजार ९०० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह पोलिस अमलदारांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मुंबई पोलीस दलात झालेल्या फेरबदल आणि बदल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. लालबाग,परळ, माटुंगा, गिरगाव या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भक्त येतात, लालबाग हा परिसर काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिते यांची बदली करण्यात आली असून पश्चिम उपनगरातील ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांची काळाचौकी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली, तसेच दादर ,परळ विभागात येणाऱ्या भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली करण्यात आली असून माटुंगा, दक्षिण मुंबईतील, व्ही.पी. रोड, गावदेवी, एलटी मार्ग, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. (Mumbai Police)
सहाय्यक पोलीस आयुक्त…..
भोईवाडा व गोरेगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना सूर्यकांत गाडेकर व रेणुका विशाल बागडे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, ओशिवरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत गणपत बांगर यांची साकिनाका विभाग, मालवणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र रघुनाथ धिवार यांची सायन विभाग आणि साकिनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरतकुमार इंद्रसेन सूर्यवंशी यांची सशस्त्र पोलीस नायगाव, दक्षिण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत शंकर माने यांची दादर विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव महादेव पोळ यांची वांद्रे विभाग, संरक्षण व सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत मधुसूदन सावंत यांची भोईवाडा विभाग, सशस्त्र पोलीस नायगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत बबनराव काटकर यांची ओशिवरा विभाग, घाटकोपर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निता अशोक पाडवी यांची मालवणी विभाग, अमरावती व नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत पंढरीनाथ राजे व शैलेश दिगंबर पासलवार यांची अनुक्रमे गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश हिंदुराव चौगुले यांची विशेष शाखा एक, मिरा-भाईंदर-वसई आणि विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग बाळासाहेब बागल यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. (Mumbai Police)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक…..
खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन रामचंद्र माने यांची विशेष शाखा एक, एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर शांताराम कुडाळकर यांची सशस्त्र पोलीस मरोळ, गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन रघुनाथ होनवाडकर विशेष शाखा एक, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेरवाडी पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मधुकर काटे यांची जे. जे मार्ग पोलीस ठाणे, व्ही. बी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शिवाजीराव चव्हाण यांची एमआयडीसी पोलीस ठाणे, मुंबई उच्च न्यायालयाच्या संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन श्रीरंग खरात यांची गुन्हे शाखा, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश धनंजय निवतकर यांची गुन्हे शाखा, सशस्त्र पोलीस मरोळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भगवान क्षीरसागर यांची गोराई पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश सोपान मच्छींदर यांची अंधेरी पोलीस ठाणे, विशेष शाखा एकचे रविंद्र वसंत क्षीरसागर यांची व्ही. बी नगर पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पांडुरंग सपकाळ यांची बीकेसी पोलीस ठाणे, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल बाबूराव ठाकरे यांची बांगुरनगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पंढरीनाथ झिपरु पाटील यांची गोवंडी पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मुरारी कदम यांची भोईवाडा पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश जगनाथ कुलकर्णी यांची व्ही. पी रोड पोलीस ठाणे, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बापूराव पवार यांची माटुंगा पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे राजेश रघुनाथ कासारे यांची माहीम पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कृष्णा दळवी यांची आझाद मैदान पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन शंकर तडाखे यांची एल. टी मार्ग पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी तुळशीराम जाधव यांची मेघवाडी पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाचे सचिन सखाराम गावडे यांची ताडदेव पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश भगवान बळवंतराव कांजूरमार्ग पोलीस ठाणे, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ तुकाराम कोळेकर यांची गावदेवी पोलीस ठाणे, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पोपट रणदिवे यांची आरएके मार्ग पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु अरुण घोरपडे यांची मानखुर्द पोलीस ठाणे, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासितअली सत्तारअली सय्यद यांची देवनार, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत शिवराम नाईकवाडी यांची विक्रोळी पोलीस ठाणे, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव दत्तात्रय धुमाळ यांची खार पोलीस ठाणे (Mumbai Police)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community