मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट बस गेली अनेक वर्ष मुंबई पोलिसांना निःशुल्क सेवा देत होती. मात्र १ जून पासून बृहन्मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांचा बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयामधून मोफत प्रवास बंद करण्यात आला आहे. मोफत प्रवास बंद झाला असला तरीही पोलिसांच्या प्रवासावर होणारा खर्च बेस्टला देणे बंद करून थेट पोलिसांच्या दरमहा वेतनात हा वाहतूक भत्ता जमा केला जाणार आहे असे पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र, शासन मान्यतेअभावी पोलिसांचा प्रवास भत्ता पगारात जमा झाला नव्हता आणि मोफत प्रवासही बंद झाल्यामुळे पोलिसांकडून नाराजीचा सूर उमटत होता. अखेर प्रशासनाने प्रवास भत्ता पगारात जमा करण्यास मान्यता दिली आहे.
( हेही वाचा : पालिका निवडणुकीआधी भाजपाच्या शिलेदारांमध्ये शाब्दिक युद्ध; मंदा म्हात्रे-गणेश नाईक आमने-सामने )
प्रवासी भत्त्याचा मार्ग मोकळा
बहुतांश पोलीस हे रेल्वे आणि स्वत:च्या खासगी वाहनातून प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मागणीचा विचार करत मुंबई पोलिसांना प्रवास भत्ता लागू करण्याबाबतचे आदेश मे महिन्यात जारी केले होते. फेब्रुवारी ९१ च्या शासन निर्णयात पोलिसांना मोफत बेस्ट सेवेबाबत नमूद केलेले आहे. हा आदेश रद्द झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारात भत्ता जमा करणे शक्य नव्हते. अखेर शासनाने हा आधीचा जीआर रद्द केल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Join Our WhatsApp Community