Mumbai pollution: मुंबईमध्ये प्रदूषणात वाढ, वाहतूक पोलिसांकडून ५३ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर ई-चलन जारी

मुंबईत दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असल्याने सर्वत्र यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

150
Mumbai pollution: मुंबईमध्ये प्रदूषणात वाढ, वाहतूक पोलिसांकडून ५३ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर ई-चलन जारी
Mumbai pollution: मुंबईमध्ये प्रदूषणात वाढ, वाहतूक पोलिसांकडून ५३ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर ई-चलन जारी

मुंबईतील प्रदूषणाची पातळी (mumbai pollution) दिवसेंदिवस घसरत असल्याने वाहतूक पोलिसांनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्षभरामध्ये वाहतूक पोलिसांनी ५३ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर ई-चलन जारी केले असून तब्बल १ कोटी ४१ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पीयूसी प्रमाणपत्र नसणे, बांधकाम साहित्याची असुरक्षित ने-आण तसेच सायलेन्सरमध्ये फेरफार करूनही प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला ; समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव)

मुंबईत दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असल्याने सर्वत्र यंत्रणा कामाला लागल्या आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण हे हवेचा दर्जा खालावण्याचे कारण आहे याशिवाय बांधकामे आणि विकास कामाच्या ठिकाणी रेडिमिक्स, कॉंक्रिट भरून नेताना ट्रक, मिक्सर आच्छादित केले जात नाहीत. हे सर्व रस्त्यावर पडते. ते हवेत उडत असल्याने प्रदूषण होते. अनेक वाहनचालक वाहनांच्या तपासणीसाठी पीयूसी प्रमाणपत्र घेत नाहीत. दुचाकीवर लक्ष वेधण्यासाठी चालक सायलेन्सरमध्ये फेरफार करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रदूषण करणाऱ्या ५२ हजार ७९८ वाहनांवर जानेवारी २०२३ पासून डिसेंबर महिनाअखेरपर्यंत ई चलान जारी करण्यात आले आहे. या चलनाच्या माध्यमातून वाहन चालकांकडून १ कोटी ४१ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.