- प्रतिनिधी
एक्स्प्रेस वे झाल्यानंतर मुंबई-पुण्याचे अंतर कमी झाले असून, दोन-तीन तासांत मुंबईतून पुण्याला जाणे शक्य झाले आहे. तसेच पुणे-बंगळुरु मार्गामुळेही पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास सुकर झाला आहे. दरम्यान, मुंबई ते पुणे हे अंतर अजून कमी करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला.
आता या प्रकल्पाचेही काम पूर्णत्वास आले असून, लवकरच नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक खुला होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एमएसआरडीने दिली आहे. या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असे नाव देण्यात आले आहे. (Mumbai-Pune Expressway)
(हेही वाचा – Crime : राज्यात २०२१ – २०२३ या वर्षांत २० हजार महिला आणि १२ हजार बालकांवर अत्याचार)
प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट गर्दी कमी करणे आणि मुंबई आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे, प्रवासाची गती आणि सुरक्षितता वाढवणे आहे. तर ६,६९५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासात परिवर्तन घडवून आणेल. या प्रकल्पाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असल्याची पृष्ठी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेव्हा हा मार्ग कार्यान्वित होईल तेव्हा मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबईतील अंतर कमी होईल. (Mumbai-Pune Expressway)
मिसिंग लिंकचे फायदे
- अंतर कमी करणे : मार्गावरून १३ किमी अंतर कमी होईल आणि घाट विभागातील कळणे काढण्यातील
- वेळेची बचत : पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ २०-२५ मिनिटांनी कमी होणार.
- सुरक्षितता सुधारणा : अपघात कमी करण्यासाठी गर्दी आणि तीक्ष्ण वळणे कमी होतील.
(हेही वाचा – Cyber Fraud : ११ महिन्यांत मुंबईकरांची १ हजार १८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक)
पूल ९८ टक्के पूर्ण
आशियातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिजः लोणावळा घाट भागातील टायगर व्हॅलीवरील पुलाचं बांधकाम होत आहे. बोगदा विभाग आणि दुसरा पूल ९८ टक्के पूर्ण झाला आहे. मात्र टायगर व्हॅली केबल- स्टेड ब्रिज मागे पडला आहे.
मिसिंग लिंकची गरज का ?
सहा पदरी द्रुतगती मार्ग आणि चार पदरी एनएच-४ या दोन्ही मार्गावरील वाहतूक खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र होते. तर खंडाळा एक्झिटजवळ वळते. परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. विशेषतः येथे भूस्खलनादरम्यान मोठी गर्दी होत असते. या अडथळ्यामुळे मुंबई-पुण्यातील अंतर वाढते कारण वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळेप्रवासाचा वेळ वाढतो. तर घाटातील वळणावर वाहनांच्या वेगात बदल होतो आणि त्यामुळे अपघात घडतात.
मिसिंग लिंक सुरू झाल्यांनतर याचा फायदा मुंबई पुणे तसेच सातारा सांगली कोल्हापूर या मार्गावर जाणाऱ्या सर्वांना होणार आहे. (Mumbai-Pune Expressway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community