नाताळनिमित्त शनिवार ते सोमवार सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईबाहेर (Mumbai Pune Expressway) जात आहेत. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करण्यासाठी अवजड वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे अनेकदा घाटात वाहनांची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी अवजड वाहनांना थांबवण्यात येते. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. वाहने आणि कार सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत एकत्र आल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना दुपारी १२ पूर्वी प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे, असे वाहतूक विभागाचे पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले.
(हेही वाचा – Dadar Savarkar Market: दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईचे प्रवेशद्वार फेरीवाल्यांनी अडवले)
वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे…
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर अवजड वाहनांचा प्रवास दुपारी १२ नंतर सुरू झाला, तर प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हायला मदत होईल तसेच वाहतूक वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनमध्ये बिघाड होणे असे त्रास टाळता येतील. यामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल. या सूचनांचे अवजड वाहन चालकांनी पालन केल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे वाहन चालकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सिंगल यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community