जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महामार्ग म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेरून पुण्याच्या दिशेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर, हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी २८ मे रोजी करण्यात येणार आहे. यासाठी १ तासाचा विशेष ब्लॉक (Mumbai-Pune Expressway Block) घेण्यात येणार आहे. (Mumbai-Pune Expressway)
महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर १.५५ किमी अंतरावर ही गॅन्ट्री उभारली जाणार असून, दुपारी १२ ते दुपारी १ वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.
(हेही पाहा – Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, प्रवाशांनी खिडकीतूनच उड्या मारल्याचा VIDEO व्हायरल)
वाहतुकीला पर्यायी मार्ग कोणता ?
या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway) मार्गावरून मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर हलक्या वाहनांना कळंबोली येथून डाव्या बाजूला वळून कळंबोली सर्कलवरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (Mumbai-Pune National Highway No. 48) या मार्गावरून मार्गस्थ होता येईल. तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कळंबोली येथून डाव्या बाजूला वळून कळंबोली सर्कलवरून कळंबोली-डी-पॉइंट- करंजाडे – पळस्पे येथून पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुढे मार्गस्थ होता येईल. त्याचबरोबर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कोन ब्रिजवरून वळवून द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.
(हेही वाचा – Veer Savarkar: हिंदुत्वाचे भवितव्य… )
याआधी केव्हा घेण्यात आला होता ब्लॉक ?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या काळामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. या ब्लॉक दरम्यान न आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येत आहेत. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.
हेही पाहा –