यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) (पुणे मार्गिका) लोणावळा एक्झिट (कि.मी क्र.५४/२२५) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम उद्या म्हणजेच १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Ashish Shelar : उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात)
जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात दोन ठिकाणी दरड मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेकडे पडली होती. त्यामुळे २४ जुलै रोजी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी सुरुवातीला २ तास वाहतूक बंद ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; मात्र वाहतूक पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागला होता. आता पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway) पुण्याकडे जाणारी मार्गिका २ तास बंद राहणार आहे.
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांना एमएसआरडीसीच्या या नियोजनामुळे प्रवासाचे नियोजन बदलावे लागणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे उद्या दुपारच्या दरम्यान मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना नियोजन बदलावे लागणार आहे. सकाळी लवकर मुंबईहून पुण्याकडे निघावे लागेल किंवा दुपारी २ च्या दरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरु झाल्यानंतर पुण्याकडे जाण्याचे नियोजन करता येऊ शकते. (Mumbai-Pune Expressway)
हेही पहा –