सध्या सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर जात आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या आनंदात बाधा येत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune highway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
(हेही वाचा –Heat waves : उष्माघातामुळे जळगाव जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू)
सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune highway) खंडाळा बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने अवजड वाहनांसाठी झिरो अवर्सचा वापर केला जात आहे. ही कोंडी फोडण्यासाठी बोरघाट येथील वाहतूक पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक करण्यात येत आहेत. उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार – रविवार या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी निघाल्याने वाहनांच्या संख्येत (Mumbai-Pune highway) वाढ झाली असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community