मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी जलद! अंतर ६ किलोमीटरने होणार कमी

142

मुंबई-पुणे दैनंदिन प्रवास करणारे हजारो लोक आहेत. तसेच काहीजण कामानिमित्त, वैयक्तिक कामासाठी कायम मुंबई-पुणे प्रवास करतात. अशा सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून आता या दोन शहरांमधील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा २५ मिनिटे वेळ वाचणार आहे.

( हेही वाचा : तुमचाही फोन हरवलाय? ‘बेस्ट’ने जारी केली गहाळ झालेल्या फोनची यादी!)

मिसिंग लिंक प्रकल्प

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या एका बोगद्याचे काम पूर्ण होत आहे. डिसेंबरपर्यंत या बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठेवण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून लोणावळ्यापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट येथे संपणार असून या प्रकल्पातंर्गत आठ पदरी नवीन रस्ता तयार केला जाणार आहे.

( हेही वाचा : राजभवनातील टेलिफोन ऑपरेटरची समुद्रात उडी मारून आत्महत्या)

यातील साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून बोगद्याची रुंदी २३.५ मीटर असणार आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे दोन्ही शहरांचे अंतर कमी होणार असून प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.